शिवसेना पक्ष ध्येय

  • आम्ही हिंदुस्थानी आहोत म्हणून हिंदुत्व हा आमच्या पक्षाचा मुख्य पाया आहे.
  • या राष्ट्राच्या विरोधात असणाऱ्यांशी शिवसेनेची लढाई ही अखंड चालू राहील.
  • स्वत:च्या हक्कासाठी उभारणीसाठी शिवसेना नेहमी प्रोत्साहन देईल.
  • समाजसेवा व सामाजिक ऐक्य हेच समाज विकासाचे मार्ग आहेत असा शिवसेनेचा ठाम विश्वास आहे म्हणून सक्रिय राजकारणापेक्षा जास्त सामाजिक चळवळीवर शिवसेनेचा अधिक भर आहे.
  • धर्म, जात व भाषा यामधल्या किरकोळ मतभेदांवर शिवसेनेचा बिलकुल विश्वास नाही. उलट याला कुणीही बळी पडू नये अशीच शिवसेनेची शिकवणूक आहे.
  • राज्याच्या अधिकृत भाषेमध्ये तरुणांना शिक्षण मिळावयास हवे.

शिवसेना पक्ष धोरणे

  • मातृभूमीबद्दल असलेल्या जबाबदाऱ्या व कर्तव्य याची जाणीव असलेला शक्तिमान, ताठ मानेने चालणारा तसेच सुसंस्कृत तरुण उभा करणे.
  • मातृभूमीसाठी केव्हाही कसलाही त्याग करावयास तयार असलेली एक शक्तिशाली संघटना निर्माण करणे.
  • राजकारण वा सत्ता नव्हे, तर समाजसेवा हेच अंतिम ध्येय आहे, अशी भावना समाजात निर्माण करणे.
  • समाजविघातक, राष्ट्रविघातक शक्तीविरुद्ध तसेच भ्रष्टाचार, अयोग्य व लालफितीत अडकलेल्या प्रशासनाच्या विरोधात ठामपणे मुकाबला करण्याची एक जाणीव समाजामध्ये निर्माण करणे.
  • युवा पिढीमधील नैराश्य हटवून त्याच्या मनामध्ये असा आत्मविश्वास निर्माण करणे की ते बेकारी, अशिक्षितपणा व गरिबीविरुद्ध लढा देऊ शकतील. त्यांना शिक्षण व विविध क्षेत्रात प्रशिक्षण देणे.
  • राष्ट्रीय हितसंबंध जपणे, कायद्याला मान देणे व संपूर्ण राष्ट्रासाठी सक्रिय सामाजिक कायदा असावा याबद्दल आग्रही असणे. समाजामध्ये बंधुत्व, एकसंधपणा व सुसंवाद प्रस्थापित करणे.