सर्वसाधारण बससेवा ३४०, मर्यादित बससेवा १२०, जदल बससेवा १५, वातानुकूलित बससेवा २४ आणि वातानुकुलित जलद बससेवा ०६ अशा एकूण ५०५ बससेवांसाठी ४७०० बसगाड्या चालविल्या जात आहेत. बेस्ट वाहतूक ही मुंबईकरांची जीवनवाहिनी बनली आहे.

मुंबईकरांची बेस्ट पसंती
हवा, पाणी, आणि अन्नाप्रमाणेच वीज हाही तेवढाच जीवनावश्यक घटक झालेला आहे. मुंबईत राहणाऱ्यांसाठी वीज आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करण्यात येणारा प्रवास हे घटक दैनंदिन जीवनाशी जोडले गेले आहेत. या दोन्ही घटकांमुळे मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठीच बेस्ट उपक्रम प्रयत्नशील असतो. मुंबईची विजेची गरज पूर्ण भागविली जाईल, याकडे बेस्ट उपक्रमाचे नीट लक्ष असते. या विजेचे दरही इतरांच्या तुलनेत स्वस्तच आहेत.

प्रवासाचा विचार केला तर मुंबई शहर आणि उपनगरांना जोडणाऱ्या बेस्टचे जाळे अफाट आहे. त्याचप्रमाणे अपंग, अंध प्रवासी, विद्यार्थी, मतिमंद विद्यार्थी, स्वातंत्रसैनिक, पत्रकार यांच्यासाठी बेस्ट विविध प्रकारच्या सवलतीच्या योजना राबवते. मुंबईकरांची गरज लक्षात घेऊन पाच रुपयांत फोर्ट फ़ेरीसारखी अनोखी फ़ेरी बेस्टतर्फ़े सुरु करण्यात आली.

बेस्टच्या या विविध प्रशंसनीय उपक्रमांमुळेच मुंबईकरांची ही “बेस्ट” पसंती ठरली आहे.

आपत्ती व्यवस्थापनसाठी सक्षम अग्निशमन दल
मुंबईवर कोणत्याही प्रकारची आपत्ती आली तर प्रसंगाला धावुन जाणारी यंत्रणा शिवसेनेने उभी केली आहे. अग्निशमन दलही त्याला अपवाद नाही. अग्निशमन दलाच्या कामगिरीने प्रभावित होऊन “फोर्स वन” पथकानेही अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रशिक्षण घेतले. ही सेवा अधिक सक्षम व्हावी यासाठी अग्निशमन दल अद्यायवत सुविधा आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आले आहे. यासाठी वडाळ्यात कमांडिंग सेंटर उभारले आहे. अशी पाच केंद्रे मुंबईत उभारण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अग्निशमन दलाच्या ताफ्यात अद्यायावत तंत्रज्ञान आणि उपकरणांनी युक्त अशा पाच हायटेक गाड्यांची भर पडली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकाराच्या आपत्तीला तोंड द्यायला मुंबईचे अग्निशमन दल सशक्त झाले आहे.

मुंबईवर येणाऱ्या कोणत्याही आपत्तीला सामोरे जाऊन मुंबईकरांचे रक्षण करणे यासाठी पालिका नेहमीच तत्पर राहिली आहे.

फक्त ५ रुपयांत अनोखी बससेवा फोर्ट फेरी

best-v-agnishaman14फोर्ट परिसरात नोकरी व पर्यटनाकरिता येणाऱ्या प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी टर्मिनस व चर्चगेट रेल्वे स्थानके जोडणारी बससेवा

क्र बसमार्ग गंतव्यस्थान प्रवासमार्ग
फोर्ट फेरी-१ छत्रपती शिवाजी टर्मिनस ते
छत्रपती शिवाजी टर्मिनस
डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी चौक, चर्चगेट रेल्वे स्थानक
मार्गे छत्रपती शिवाजी टर्मिनस
2 फोर्ट फेरी-२ छत्रपती शिवाजी टर्मिनस ते
छत्रपती शिवाजी टर्मिनस
चर्चगेट रेल्वे स्थानक, डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी चौक
मार्गे छत्रपती शिवाजी टर्मिनस

प्रवाशांच्या सुरक्षेकरिता

best-v-agnishaman21अलीकडे दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढलेले असून आतंकवादी सार्वजनिक ठिकाणांना आपले लक्ष्य करीत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था अतिशय महत्त्वाची झालेली आहे. ही बाब विचारात घेऊन बेस्ट उपक्रमाने बसगाड्यांमध्ये सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेऊन त्यावर कार्यवाही सुरू केलेली आहे. उपक्रमाच्या १४४६ बसगाड्यांमध्ये सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. तसेच सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्यांसोबत एल. सी. डी. टी. व्ही. देखील या १४४६ बसगाड्यांमध्ये बसविण्यात आलेले आहेत. तसेच एकूण १५५ बसगाड्यांमध्ये जीपीएस सिस्टिम बसविण्यात आलेली आहे.

प्रवाशांच्या सोयीकरिता ई-टिकेटिंग

best-v-agnishaman31प्रवाशांच्या सोयीकरिता पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने बेस्ट उपक्रमामध्ये अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविल्या. ई-टिकेटींग सुविधा ही सुध्दा याच उपक्रमांपैकी एक. शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. याप्रसंगी पालिकेतील सभागृह नेते सुनील प्रभू, बेस्ट समिती अध्यक्ष सुनील शिंदे, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष राज पुरोहित उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवा

best-v-agnishaman41मुंबईच्या एकूण ५१० मार्गांवर ४७०० बसेसद्वारे किफायतशीर आणि सुरक्षित प्रवासी सेवा दिली जात असून आजची तरुण पिढी ही उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असल्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवा सुरू करून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली. त्याचप्रमाणे केवळ १२० रुपयांमध्ये मासिक पासही उपलब्ध करून देण्यात आले.

मोबाईल वीज भरणा केंद्र

best-v-agnishaman51मुंबईत ठिकठिकाणी असलेल्या अधिकृत वीज बिल भरणा केंद्रांवर बिले भरण्यासाठी होणारी गर्दी कमी होण्यासाठी फिरती रोख बिल भरणा केंद्रे ( मोबाईल कॅश कलेक्शन ) सुरू करण्यात आली. धनादेश स्वीकारण्याची यंत्रणाही सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांची चांगलीच सोय झाली आहे.

वातानुकूलित बस आणि ओपनडेक बस

best-v-agnishaman61मुंबईच्या असह्य उकाड्यातून मुंबईकरांना दिलासा मिळावा यासाठी तसेच पर्यटकांसाठी बेस्ट उपक्रमा मार्फत वातानुकूलित बससेवा आणि मुंबईचे पर्यटन करणाऱ्यांसाठी ओपनडेक बससेवा खूपच उपयुक्त ठरली आहे.

विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी सदैव सतर्क असणारी युवा सेना

best-v-agnishaman71युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पाठपुराव्यामुळे बंट कॉलेज मार्गावर (वांद्रे-कुर्ला संकुल) नवीन बेस्ट बस सुरू झाली. या बससेवेमुळे कॉलेज विद्यार्थ्यांप्रमाणेच परिसरातील नागरिकांची चांगली सोय झाली आहे.

ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी ‘बेस्ट आपल्या दारी’

best-v-agnishaman81मुंबईकर वीज ग्राहक आणि बेस्टचे प्रवासी यांच्या शंकांचे निरसन व्हावे तसेच या दोन्ही सेवांबाबतच्या त्यांच्या तक्रारींची माहिती घेता यावी यासाठी ‘बेस्ट आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाद्वारे सर्वसामान्य मुंबईकरांना बेस्ट समिती अध्यक्षांची थेट संपर्क साधता येणार असून त्यामुळे बससेवा आणि वीजपुरवठ्यासंबंधीच्या तक्रारी तातडीने सुटण्यास मदत होणार आहे.

‘बेस्ट’ची विजच ‘बेस्ट’

best-v-agnishaman91विजेचे दर ठरवताना विद्युत परवानेधारकाला पडणाऱ्या विद्युत पुरवठ्याच्या सरासरीची किंमत ही विचारात घेतली जाते. वार्षिक महसुली आवश्यकतेमध्ये वीज खरेदीचा खर्च जवळजवळ ८५ टक्के एवढा असतो. मुख्यत: विद्युत खरेदीचा खर्च कमी असल्यामुळे आणि टाटा पॉवर वीज उत्पादन करणाऱ्या कंपनीबरोबर मान्यताप्राप्त ऊर्जा खरेदी करार करण्यात आल्यामुळे इतर विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या तुलनेत बेस्ट उपक्रमाचे विद्युत दर कमी आहेत. त्यामुळे लक्षावधी मुंबईकरांना त्याचा लाभ होत आहे.

बेस्टचे ‘शून्य भारनियमन’

best-v-agnishaman101भारनियमनाने सबंध महाराष्ट्राला विळखा घातला असला तरी मुंबई शहर मात्र त्याला अपवाद आहे. मुंबई शहराचा (कुलाबा ते माहीम व कुलाबा ते शीव) विचार केला तर विजेची मागणी सुमारे ९५० मेगावॅट आहे. ही मागणी पूर्ण करता यावी यासाठी बेस्ट उपक्रमातर्फे टाटा पॉवर कंपनीसोबत ९०० मेगावॅट वीज पुरविण्याबाबत करार करण्यात आला आहे. मुंबईची विजेची मागणी जसजशी वाढत गेली, तसतसा टाटा पॉवर कंपनीकडून घेण्यात येणाऱ्या वीज खरदीही वाढविण्यात आली. मुंबईला भारनियमनाची झळ पोहोचू नये यासाठी अतिरिक्त वीज इतर कंपन्यांकडून खरेदी करण्यात येते. अशा प्रकारे वीज खरेदीचे उत्तम व्यवस्थापन केल्यामुळे बेस्टने मुंबईकरांना भारनियमनाची झळ बसू दिलेली नाही.

अग्निशमन दलात पाच हायटेक गाड्या

best-v-agnishaman111अग्निशमन दलाच्या ताफ्यात पाच हायटेक गाड्यांचा समावेश झाला असून या आधुनिक गाड्या भूकंप, बॉम्बस्फोट इत्यादी आपत्तींच्या वेळी उपयोगी पडणार आहेत. नेदरलँडमधून मागविलेल्या या गाड्या १०५ अत्याधुनिक साधनांनी सज्ज आहेत. या प्रत्येक गाडीची किंमत ३.५ कोटी रुपये एवढी आहे. या गाड्या हाताळण्यासाठी अग्निशमन दलाच्या १२० कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. भायखळा, वडाळा, मरोळ, विक्रोळी आणि बोरिवली येथील अग्निशमन दलांतील केंद्रांमध्ये या गाड्या ठेवण्यात येणार आहेत.

अग्निशमन दलाकडे अत्याधुनिक रिमोट कंट्रोल यंत्रणा

best-v-agnishaman121मुंबईत मोठमोठे मॉल आणि उंच इमारती उभ्या राहात आहेत. त्यांना लागलेली आग आटोक्यात आणणे हे अग्निशमन दलापुढील आव्हान ठरले आहे. पूर्वी २० मजल्यांपर्यंत लागलेली आग विझविण्याची क्षमता अग्निशमन दलाकडे होती. आता २२ मजल्यांपर्यंत लागलेली आग विझवण्याची क्षमता अग्निशमन दलाकडे आहे. त्यासाठी अत्याधुनिक रिमोट कंट्रोल यंत्रणा असलेला हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.

पालिकेने उभारले अद्ययावत कमांडिंग सेंटर

best-v-agnishaman132अग्निशमन दलासाठी आधुनिक साधने खरेदी करण्यासाठी २२ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. अग्निशमन दलाची क्षमता वाढविण्यासाठी २३ फायर इंजिन्स, पाच रेस्क्यू व्हॅन, ३५ थर्मल इमेजिंग कॅमेरे, १० पोर्टेबल कॅमेरे तसेच बीच सेफ्टी इक्विपमेंटचे सहा संच खरेदी करण्यासाठी ७० कोटी रुपयांची वेगळी तरतूद करण्यात आली आहे. मुंबईत एकूण सहा कमांडिंग सेंटर्स बांधण्यात येणार आहेत.