मुंबई शहरात प्रतिदिन ६५०० मे. टन कचऱ्याची निर्मिती होते. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची देवनार व मुलुंड या ठिकणी भरावभुमी कार्यरत आहेत. तर गोराईतील भरावभुमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षात मुंबईतुन १ कोटी २३ लाख मेट्रिक टन घनकचरा उचलला गेला.

आदर्श कचरा व्यवस्थापन

मुंबईची प्रचंड लोकसंख्या लक्षात घेता, या शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन हे सुध्दा आव्हानात्मक असते. मुंबई महानगरपालिकेने हे आव्हान सक्षमतेने पेलले आहे. याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे, गोराई येथील कचऱ्यावर पालिकेने फुलविलेली हिरवाई. ही क्षेपणभुमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. या प्रकल्पामुळे गोराईच्या परिसरातील रहिवाशांचे जीवनमान उंचावले, तेथील जागांच्या किमतीही वाढल्या. अशाच प्रकारे मुलुंडमधील क्षेपणभुमीतुन अपारंपारिक ऊर्जा तयार करण्याची पालिकेची योजना आहे. मुंबईभर पालिकेने राबविलेल्या शुन्य कचरा मोहिमेची दखल तर राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. मुंबईतील काही वस्त्यांमध्ये पालिकेने दत्तक वस्ती योजना राबविली. या वस्त्यांमधील स्थानिकांना विश्वासात घेऊन राबविलेल्या या उपक्रमाने या वस्त्यांचा कायापालट झाला. मुंबई स्वच्छ, सुंदर दिसावी यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबरोबरच मुंबई प्रदुषणमुक्त व्हावी यासाठीही पालिका प्रयत्नशील असते. विलेपार्ले (पू.) परिसरात “प्लास्टिक पिशवीचा मोह टाळा” ही अनोखी मोहीम पालिकेने राबविली. तेथील रहिवासी आणि विक्रेते यांच्याशी सुसंवाद साधत ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली. पालिकेने घेतलेल्या या पुढाकाराला पार्ल्यातील रहिवाशांनी अनुकूल प्रतिसाद दिला आणि आज विलेपार्ले (पूर्व) हा भाग प्लास्टिकच्या पिशव्यांपासून मुक्त झाला आहे. या मोहिमेअंतर्गत एकीकडे रहिवाशांना कापडी पिशव्या वापरण्यास प्रोत्साहन दिले आणि या पिशव्या तयार करण्याचे काम बचत गटांना दिल्यामुळे रोजगार निर्मितीही झाली.

गोराईतील कचऱ्यावर तयार झाली हिरवाई

Education81चार वर्षांपूर्वीपर्यंत गोराई खाडीच्या काही किलोमीटर परिसरातील रहिवासी प्रचंड हैराण झाले होते. कचऱ्याची सततची दुर्गंधी त्यांच्या नाकात भरून राहिली होती. आज मात्र या परिसराचा कायापालट झाला आहे. क्षेपणभूमीवर उभे राहून मोकळा श्वास घेता येतो. धुराचा नायनाट झाल्यामुळे समोरील गोराई खाडीवर आणि त्यानंतर समोरील काठावर असलेल्या पॅगोडाच्या कळसाला स्पर्श करणाऱ्या सूर्यकिरणांमुळे तयार होणारे दृश्य हे नजरबंदी करणारे असते. गोराई क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याच्या मुंबई महापालिकेने घेतलेल्या निर्णयाने आणि त्याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे दुर्गंधीयुक्त क्षेपणभूमीवर नंदनवन उभे राहिले आहे.

केंद्र सरकारने दखल घेतलेली ‘शून्य कचरा’ मोहीम

clean-city-Greensity21मुंबई महानगरपालिकेच्या वतीने १९९७ पासून मुंबई शहरामध्ये ‘शून्य कचरा’ मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली तेव्हा प्रशासनासमोर झोपडपट्टीतील समस्यांना तोंड कसे द्यायचे हे एक मोठे आव्हान होते. ‘शून्य कचरा’ मोहीम म्हणजे फक्त दैनंदिन स्वच्छता कार्यक्रम नव्हता तर स्वच्छता आणण्याकरिता संपूर्ण बदल घडविण्याचे उद्दिष्ट होते. धारावीच बदल राष्ट्रीय प्रश्न बनला. केंद्र सरकारनेही या मोहीमेची दखल घेतली. म्हणून ही बाब पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाला अभिमानाची ठरली.

लोकसहभागातून यशस्वी झाली दत्तक वस्ती योजना

clean-city-Greensity31शिवसेना-भाजपा युतीने मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये तेथील नागरिकांनीच टाकलेल्या कचऱ्यामुळे जे बकाल स्वरुप येते ते संपुष्टात यावे यासाठी दत्तक वस्ती योजना राबवून मुंबईच्या स्वच्छतेचा विडा उचलला. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थानातील अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली व स्थानिक रहिवाशांच्या मदतीने ही योजना राबविण्यात आली. लोकसहभागातून ही दत्तक वस्ती योजना यशस्वी झाली.

नालेसफाईची कामे

clean-city-Greensity61मुंबईमध्ये विविध ठिकाणी असलेल्या नाल्यांमध्ये जमा होणारा कचरा साफ करुन पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण होऊन मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी शिवसेना-भाजपाने नालेसफाईवर विशेष लक्ष केंद्रित केले. घनकचरा व्यवस्थापन करताना गेल्या पाच वर्षात तब्बल १ कोटी २३ लाख मेट्रिक टन कचरा उचलला गेला. अनेक ठिकाणच्या नाल्यांची सफाई तर केलीच, पण काही ठिकाणच्या नाल्यांना संरक्षक भिंती बांधून पावसाळ्यातील पुराचे पाणी बाहेर येणार नाही, याचीही काळजी घेतली. त्याचप्रमाणे पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यासाठी ताडदेव भागातील ब्रिटीशकालीन पर्जन्य जलवाहिन्यांच्या (आर्च ड्रेन) दुरुस्तीची कामेही पार पाडली.

नालेसफाईची पाहणी

clean-city-Greensity71कोणत्याही योजना केवळ कागदावर आखून चालत नाहीत. त्या प्रत्यक्षात अंमलात येत आहेत किंवा नाहीत याची पाहणी करणेही गरजेचे असते. यासाठीच शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे हे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईतील सर्व नाल्यांची नगरसेवक व अधिकाऱ्यांसह पाहणी करून सर्व कामे ठाकठीक करुन घेतात. पर्जन्य जलवाहिन्यांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये रुपये १५१४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.