मुलांना प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन देणे हे महानगरपालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. ही जबाबदारी पालिकेच्या आठ माध्यमांच्या एकुण ११८५ शाळांमधुन ३, ९१, १११ विद्यार्थ्यांना शिक्षण देत पुर्ण करण्यात येत आहे.

महापालिका शाळांची गरुडझेप

महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे बहुधा आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील असतात. असे असले तरी या विद्यार्थांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणुन मुंबई महानगरपालिका सतत प्रयत्नशील असते. त्यापैकी महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे पालिकेच्या शाळांमध्ये राबविण्यात आलेला व्हर्च्युअल क्लासरुमचा प्रकल्प. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रत्येकी एक एलसीडी आणि वेबकॅम असुन अंधेरी येथील स्टुडिओतुन तज्ज्ञ आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांशी एलसीडीमार्फत थेट संवाद साधता येतो. त्यामुळे प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना एकच धडा शिकविण्याची गरज पडत नाही. या स्टुडिओतुनच शाळांमधील विद्यार्थ्यांशी एकदम संवाद साधुन त्यांच्या प्रश्नांचे निरसनही केले जाते. तसेच विद्यार्थ्यांनाही आपले प्रश्न या एलसीडीद्वारे तज्ज्ञांना विचारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतुन राबविलेल्या या उपक्रमाच्या उदघाटन सोहळ्यासाठी लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्री. रघुनाथ माशेलकर उपस्थित होते. एकाच वेळी पालिकेच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांकडुन शिकण्याची संधी मिळाली आहे. त्याच बरोबर या विद्यार्थ्यांना २७ प्रकारचे शैक्षणिक साहित्य मोफत पुरविण्यात येते. पालिका शाळांच्या विकासासाठी १८०० कोटि रुपयांची तरतुद करण्यात आली असुन राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी १ कोटी २० लाख रुपयांच्या शिष्यवृत्त्या देण्यात येणार आहेत. पालिका शाळांमधील वातावरण शिक्षणाला पोषक असावे, यासाठी पालिका शाळांचे रुपडे बदलण्यात आले. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत खिचडी देण्यात येते. तसेच दहवीच्या विशेष अभ्यासवर्गातील विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात येतो. पालिकेच्या या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणुनच पालिकेच्या विद्यार्थ्यांची शालांत परिक्षेतील कामगिरी अत्यंत चमकदार झाली.

उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारली व्हर्च्युअल क्लासरूम

Education11एकाच वेळी पालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी दृकश्राव्य माध्यमाचा (व्हर्च्युअल क्लासरूम) वापर करावा अशी माझी संकल्पना होती. ती प्रत्यक्षात साकारली आहे. या दृकश्राव्य माध्यमामुळे विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन मिळेल आणि पालिका शाळांचा शैक्षणिक दर्जाही उंचावेल, असा विश्वास शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.

पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत ‘शैक्षणिक साहित्य’ वाटप

Education21महापालिकेच्या शाळेत शिकणारे बहुतेक विद्यार्थी हे गरीब कुटुंबातील असतात. त्यामुळे शिकण्याची इच्छा असूनही शैक्षणिक साहित्य विकत घेण्याची क्षमता नसते. परिणामी त्यांच्या शिक्षणाच्या ओढीवर बंधने येतात. ही परिस्थिती लक्षात घेत पालिकेने २००७-०८ सालापासून या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोफत देण्यास सुरुवात केली. सन २०१०-११ मध्ये शिशुवर्ग ते दहावीपर्यंतच्या सुमारे चार लाख चाळीस हजार विद्यार्थ्यांना या वस्तू पुरविण्यात आल्या. यात वह्या, पुस्तके, गणवेश, रेनकोट, बूट इत्यादी २७ वस्तूंचा समावेश आहे.

शाळा सुधार प्रकल्पा’च्या माध्यमातून दर्जा उंचावला

Education31शाळांची गुणवत्ता आणि दर्जा सुधारण्याचा संकल्प पालिकेने सोडला असून विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि त्यांची टक्केवारी वाढविण्याचे उद्दिष्ट पालिकेने समोर ठेवले आहे. खासगी शाळांचे वाढते प्रमाण आणि इंग्रजी शिक्षणाकडे विद्यार्थी आणि पालकांचा वाढता कल लक्षात घेता, पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी आणि गुणवत्ता सुधारावी यासाठी पालिकेतर्फे विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. पालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी युनिसेफ या संस्थेचे सहकार्य घेण्याचेही पालिकेने ठरविले आहे.

महानगरपालिकेच्या चकाचक शाळा

Education41महानगरपालिकेच्या सुशोभित आणि चकचकीत शाळा मुंबईत प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहेत. मुंबईतील शीव, कांदिवली, चेंबूर, नायगाव, विक्रोळी, धारावी, माहीम, दादर अशा विविध भागांत महानगरपालिकेच्या स्वच्छ आणि सुंदर शाळा पाहायला मिळतात. मुंबई महानगरपालिकेच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पात शाळा सुधार प्रकल्पांकरिता ४८.२९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

युवासेनेच्या प्रयत्नांतून होतकरू विद्यार्थ्यांना मिळाले छप्पर

Education51अभ्यास करायची इच्छा आहे परंतु अभ्यास करायला जागा मात्र नाही, अशी मुंबईतील अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती असते. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांवर रस्त्यांवरील दिव्याखाली किंवा उद्यानांमध्ये बसून अभ्यास करण्याची वेळ येते. या होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या प्रयत्नांतूनच मुंबई महापालिकेच्या १६ शाळांमध्ये रात्रीच्या अभ्यासिका सुरू झाल्या.

हिंदुस्थानातील सर्वात मोठी चित्रकला स्पर्धा

Education61मुंबईच्या महापौरांतर्फे ‘माझी मुंबई’ या विषयावरील भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नजरेतील ‘मुंबई’ कागदावर चितारली. या स्पर्धेत तब्बल ७० हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.

महापालिकेचा भर शिक्षणावर

Education71नवीन पिढी घडविताना त्या पिढीचे शिक्षण कशा प्रकारे झाले आहे, हे खूप महत्त्वाचे असते. पालिका शाळांमध्ये येणारे विद्यार्थी तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल सामाजिक स्तरातील असतात, हे लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने २०१०-२०११ या आर्थिक वर्षासाठी शिक्षणासाठी तब्बल १८०० कोटींची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळाले यासाठी तब्बल १ कोटी २० लाख रुपयांच्या शिष्यवृत्त्याही देण्यात येणार आहेत. शिक्षणासाठी केलेल्या या तरतुदीमुळे पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात येणार आहेत.