उद्याने ही शहराची श्वसन केंद्रे असतात ही बाब लक्षात घेऊन मुंबई शहरात जास्तीत जास्त उद्याने असावीत या हेतूने अनेक उद्याने बनविण्यात आली. सध्या मुंबईत २४२ उद्याने आहेत, त्याचप्रमाणे मुंबईच्या अनेक रस्त्यांच्या नाक्यांवर वाहतूक बेटेही बनवण्यात आली असून ती मुंबईची शान वाढवीत आहेत.

हरित मुंबई, सुंदर मुंबई

एकीकडे पायाभूत सुविधा पुरविण्याबरोबरच मुंबई शहर सुंदर दिसावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेत अनेक ठिकाणी उद्याने उभी केली. सुशोभीकरण केले आणि मुख्य म्हणजे एकाही उद्यानाचे आरक्षण न बदलता मुंबईच्या सौंदर्यात भर घातली. त्यामुळे येथील नागारिकांना निसर्गाशी जवळीक साधता आली आणि शहरी जीवनाचा एक अविभाज्य घटक असलेल्या प्रदूषणापासून काही काळ का होईना, पण मुक्ती मिळाली.

पवई येथील तलावाकाठी काही वर्षांपूर्वीपर्यंत गर्दुल्ल्यांचे राज्य होते. तेथे असलेल्या कचऱ्यामुळे त्या परिसरातून चालत जाणेही तेथील रहिवाशांना नको होत असे. पालिकेच्या प्रयत्नांतून आता याच ठिकाणी निसर्ग उद्यान उभे राहिले आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जॉगिंग ट्रॅकही उभारण्यात आला आहे.

पवई तलावाकाठच्या परिसराप्रमाणेच दादरच्या गर्दीत थोडा वेळ विसावा घेता यावा यासाठी वीर कोतवाल उद्यानात केलेली सुधारणा, वरळी येथील आद्य शंकराचार्य उद्यान इत्यादी बाग-बगिचांनी मुंबईच्या सौंदर्यात भर घातली. बाल-गोपाळांपासून ते ज्येष्ठ नागारिकांपर्यंत सर्वांसाठीच या उद्यानांमध्ये सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शहिदांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मुंबईत हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे आणि तुकाराम ओंबळे यांच्या नावे उद्याने उभारण्यात आली आहेत.
मुंबईच्या जीवनातील अजून एक अविभाज्य घटक म्हणजे येथील वाहतूक. शहरांतर्गत प्रवास करताना, अनेक चौकांमध्ये थांबावे लागते. मुंबईकर प्रवाशांचे हे थांबणेसुद्धा सुखकर व्हावे याची दक्षता पालिकेतर्फ़े घेण्यात आली आहे. हे चौक विविध प्रकारच्या शिल्पाकृतींनी सजविण्यात आले आहेत. प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरासमोरील हत्ती, गोरेगाव येथील गोकुळधाम परिसरातील सिंहाच्या शिल्पाकृती या त्या त्या परिसरातील लँडमार्क होऊन राहिल्या आहेत.

जागतिक दर्जाच्या या शहराचे सौंदर्यही तसेच असावे, यासाठी मुंबई महानगरपालिका सतत प्रयत्नशील राहिली आहे.

मैदानांच्या विकासावर पालिकेचा भर

udyane-v-vahatuk-bete11मुंबईतील हिरवाई जपण्याचा, वाढविण्याचा निर्धार मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाने केला असून याच अनुषंगाने खेळाची मैदाने आणि मनोरंजन मैदानांच्या विकासाकडेही लक्ष देण्यात येत आहे. पर्यटन स्थळ असलेल्या मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेवर आणि विकासवरही विशेष लक्ष देण्यात येते आहे. यासाठी सुमारे ८० कोटी रुपये एवढ्या आर्थिक निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने आतापर्यंत १६ थीम गार्डन्स विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे.

पवई तलावकाठाचे सुशोभीकरण

udyane-v-vahatuk-bete21पवईचा तलाव येथे असलेल्या कचऱ्याच्या जागी निसर्ग उद्यान उभे राहिले आहे. शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उद्यायनाचे उद्घाटन झाले. या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक बांधण्यात आला आहे. हा पूर्ण परिसर विकसित करताना, जॉगिंग ट्रॅक बांधताना, मार्गिका बांधताना एखादे झाड मध्ये आले तर ते न तोडता रस्त्याची दिशा वळविण्यात आली. त्याचप्रमाणे या भागातील उंच-सखलपणा तसाच ठेवून त्याचा या निसर्ग उद्यानासाठी वापर करण्यात आला. त्यामुळे येथे फार खोदकाम करण्यात आले नाही. येथे बसविण्यात आलेले ग्रॅनाईट हे थेट युरोपच्या धर्तीवर बसविण्यात आले आहेत. पवई आणि आसपासच्या भागात राहणाऱ्यांसाठी ही एक चांगली सुविधा निर्माण झाली आहे.

माझगाव येथील बाप्टिस्टा उद्यान नव्या स्वरुपात

udyane-v-vahatuk-bete31लोकमान्य टिळकांचे सहकारी आणि स्वातंत्र्यसैनिक जोसेफ बाप्टिस्टा यांचे नाव स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या उद्यानास देण्यात आले. या उद्यानात बालोद्यान, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, कारंजे, धबधबा आदि सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या उद्यानाचे आता सुशोभीकरण करण्यात आले असून अलीकडे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या उद्यानाचे उद्घााटन केले.

आरे भास्कर उद्यान - गोरेगाव येथील हिरवाई

udyane-v-vahatuk-bete51मुंबईच्या विकास आराखड्यात मनोरंजनासाठी आरक्षित असलेल्या भूखंडांवर आरे भास्कर संस्थेच्या विद्यमाने भास्कर उद्यान विकसित करण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत अत्यंत दुलर्क्षित व अविकसित असलेल्या भूखंडाचे रुपांतर आता अत्यंत रमणीय अशा उद्यानात झाले असून येथील हिरवाई आणि जॉगिंग ट्रॅकमुळे अबालवृद्धांसाठी हे विरंगुळ्याचे ठिकाण झाले आहे. अनेक पारितोषिकांनी गौरविण्यात आलेल्या या उद्यानाने मुंबईच्या सौंदर्यात नक्कीच भर टाकली आहे. समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने मुंबईतील अनेक अविकसित भूखंड विकसित करुन नागरिकांच्या आनंदासाठी उपलब्ध करुन देण्याचे पालिकेचे धोरण आहे.

गर्दीपासून विसावा देणारे दादरचे वीर कोतवाल उद्यान

udyane-v-vahatuk-bete61दादरच्या गर्दीपासून विसावा हवा असेल तर अनेकांची पावले वीर कोतवाल उद्यानाकडे वळतात. त्यामुळेच या उद्यानाचे नूतनीकरण करण्याची योजना पालिकेने आखली. ज्यांच्या नावाने हे उद्यान आहे, त्या वीर कोतवाल यांचा पुतळा नीट दिसत नव्हता. त्यामुळे तो व्यवस्थित दिसेल, अशा ठिकाणी त्याची स्थापना करण्यात आली. त्याचप्रमाणे बैठक व्यवस्थाही बदलण्यात आली व मार्गिका तयार करण्यात आली. मुंबईकरांच्या दृष्टीने या उद्यानाचे एक आगळे महत्त्व आहे.

उल्लेखनीय उद्याने

udyane-v-vahatuk-bete71उद्याने ही शहरांची श्वासोच्छ्वासाची केंद्रे असतात. त्यामुळे शिवसेना-भाजपाने मुंबई शहरामध्ये उद्याने उभारण्याला प्राधान्य दिले. दहिसर येथील पद्मभूषण बाबा आमटे उद्यान, परळ येथील वामनराव महाडिक उद्यान, मलबार हिल येथील फिरोजशहा मेहता उद्यान, लोअर परळ येथील मातोश्री रमाबाई केशव ठाकरे उद्यान ही अलीकडच्या काळात बांधली गेलेली उद्याने आहेत.

शहिदांना पालिकेची मानवंदना

udyane-v-vahatuk-bete81तीन वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, तुकाराम ओंबळे शहीद झाले. या चारही जणांनी दाखविलेले धाडस कोणीही मुंबईकर विसरु शकणार नाही. त्यांच्या पराक्रमाच्या स्मृती मुंबईकरांच्या कायम स्मरणात राहव्या यासाठी करकरे, कामटे आणि साळसकर यांच्या नावाने मुंबईत उद्याने उभारण्यात आली आहेत. तसेच तुकाराम ओंबळे यांचा पुतळा गिरगाव चौपाटीवर बसविण्यात आला आहे. अलीकडेच शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या ठिकाणाला प्रेरणास्थळ असे नाव देण्यात आले.

चौकांनी वाढवली रस्त्यांची शोभा

udyane-v-vahatuk-bete91मुंबईमध्ये अनेक ठिकाणी चौक असून त्यांचे सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. अलीकडच्या काळात माझगाव येथील महाराणा प्रताप चौक, प्लाझा सिनेमासमोरील चौकातील भाजीवाला आदि उपक्रम राबवण्यात आले. हे चौक रस्त्यांची शोभा वाढवीत आहेत.

रस्त्यांवरील चौकांनाही प्राप्त झाले सौंदर्य

udyane-v-vahatuk-bete101मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालणारे अनेकविध उपक्रम पालिकेने राबविले. विविध उद्यानांप्रमाणेच रस्त्यांच्या चौकांच्या सुशोभीकरणाचे कामही पालिकेने पार पाडले. त्यापैकी एक म्हणजे गोरेगाव येथील गोकुळधाम परिसरातील चौकात सिंहाचे शिल्प उभारण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरासमोरील चौकात हत्तीचे शिल्प उभारण्यात आले आहे. शिल्पांप्रमाणेच मुंबईत काही ठिकाणी हे चौक फुलझाडे लावून सुशोभित करण्यात आले आहेत. मुंबई शहरात फिरताना येथील नागरिकांना प्रसन्न वाटावे, शहराचा चेहरामोहरा सुंदर दिसावा हाच पालिकेचा उद्देश आहे.