महाराष्ट्राची राजधानी तसेच भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगराचे क्षेत्रफळ केवळ ४३७.७१ चौ. कि. मी. असून दीड कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. या महान महानगरातील नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, मुंबईच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध आहे.

हा गौरव प्रशासनाचा!

अफाट लोकसंख्या असलेल्या मुंबई शहराला आणि मुंबईकरांना प्रशासकीय सुविधा पुरविण्यात कोणत्याही प्रकारची कसर राहणार नाही, याची दक्षता मुंबई महानगरपालिकेकडून नेहमीच घेण्यात येते. या दक्ष प्रशासकीय कारभाराबाबत राष्ट्रीय पातळीवर मुंबई महापालिकेचे अनेकदा कौतुकही झाले आहे.

शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करणारी पहिली महापालिका, राष्ट्रीय जलपुरस्कार, बेस्ट मेगासिटी पुरस्कार अशा विविध पुरस्करांनी पालिकेला गौरविण्यात आले आहे.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे दररोज अनेक मालवाहू वाहनांना मुंबईचे जकात नाके ओलांडावे लागतात. या ठिकाणचा कारभार पारदर्शक राहावा आणि काम लवकर व्हावे यासाठी जकात नाक्यांचे संगणकीकरण करण्यात आले. आता तर इंटरनेटच्या माध्यमातूनही जकात कर भरता येऊ शकतो. पालिकेने उचललेल्या या पावलामुळे जकात करामधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

जो प्रकार जकातीचा तोच विविध निविदांचा… मुंबईतील विविध विकासकामांचे नियंत्रण एकाच प्रणालीतून व्हावे, यासाठी मुंबई पालिकेने इंजिनीअरिंग हब उभारले. अशा प्रकारचे केंद्र उघडणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका आहे.

महापालिकेतर्फ़े पुरविण्यात येणाऱ्या सेवा सहजासहजी नागरिकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी पालिकेतर्फ़े ५०० नागरी सुविधा केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.

इतके उपक्रम राबवूनही पालिका कर्जमुक्त आहे. स्वत:च्या निधीमधूनच पालिकेने हे प्रकल्प राबविलेले आहेत.
मुंबईत राहणाऱ्यांना मुंबई हे सोयी-सुविधांनी युक्त असे शहर वाटावे, हाच पालिकेचा ध्यास आहे.

मुंबईतील चकाचक मंडया

11भाजी मंडया किंवा मासळी बाजारात अनेकदा अस्वच्छता आढळून येते. ग्राहक आणि दुकानदार या दोघांच्याही दृष्टीने ते गैरसोयीचे असते. त्यामुळेच मुंबईतील मंडया आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि अत्याधुनिक करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. शहरातील ५१ मंडया अशा प्रकारे विकसित करण्याचा प्रस्ताव महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी पारित केला. दरम्यान, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष जाऊन काही मंडयांची पाहणी केली.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची जागतिक स्तरावर दखल

21कोणत्याही आपत्तीच्या वेळी या विभागाला पूर्ण क्षमतेने कार्य करता यावे यासाठी हा विभाग पायाभूत सुविधांनी सुसज्ज करण्यात आला आहे. संवाद यंत्रणा, अखंडित पाणीपुरवठा, पॅन्ट्री आणि विश्रांतीसाठीच्या खोल्या, वाचनालये, त्याचप्रमाणे पर्जन्यमापन करण्यासाठी २९ ठिकाणी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन (स्वयंचलित हवामान यंत्रणा) बसविण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात वाहतूक, पोलीस, होमगार्ड, नागरी सुरक्षा या विभागांच्या पदाधिकाऱ्यांची आपत्ती व्यवस्थापन विभागात विशेष नेमणूक करण्यात येते.

पालिकेच्या कार्यालयांना दिला नवा चेहरा

31शिवसेना-भाजपा युतीने मुंबईचा कारभार जेथून चालतो त्या पालिकेच्या कार्यालयांना नवा चेहरा देण्यासाठी पालिकेची कार्यालये चकाचक करण्याचा उपक्रमही राबवण्यात आला. त्यामुळे पालिकेच्या कार्यालयांचा चेहराच बदलून गेला आहे.

नागरी सुविधा केंद्र

41मुंबई महापालिकेतर्फे पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा जलद गतीने मिळाव्यात यासाठी पालिकेतर्फे २४ विभागात नागरी सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. वातानुकूलित दालने, आसनव्यवस्था, टोकन क्रमांक पद्धत सुरू केल्यामुळे रहिवाशांना या सुविधेचा लाभ अधिक चांगल्या प्रकारे घेता येतो. या केंद्रांमध्ये जन्म-मृत्यू दाखले, कर भरणा, तक्रार निवारण, पाणी व मालमत्ता कर इत्यादी विविध प्रकारच्या सेवा एकाच केंद्रात पुरविण्यात येतात.

पालिकेने स्थापन केले देशातील पहिले ‘इंजिनीअरिंग हब’ !

5मुंबई शहराची व्याप्ती आणि येथील रहिवाशांच्या गरजा पाहता, एकाच वेळी अनेक विकासकामे मुंबईभर सुरू असतात. या सर्व विभागांच्या आणि प्रकल्पांच्या समन्वयासाठी मुंबई महापालिकेने वरळी येथील डॉ. ई. मोझेस मार्गावरील महापालिका भांडार इमारत येथे इंजिनीअरिंग हब (अभियांत्रिकी केंद्र) स्थापना केले आहे. या विभागाचे उद्घाटन अलीकडेच शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. या केंद्रात संगणक यंत्रणा, मध्यवर्ती निविदा प्रक्रिया केंद्र, अभिलेख कक्ष, वाचनालय, परिषद सभागृह इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.

अभिलेख भवन

6मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाच्या साधनांपैकी महत्त्वाचे साधन असलेल्या प्रॉपर्टी टॅक्स संदर्भातील महत्त्वाची सर्व माहिती एकत्र मिळावी, नागरिकांना चांगली सेवा-सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी कांदिवली येथे अभिलेख भवन उभारण्यात आलेले आहे. १९६२ सालापासूनची सर्व महत्त्वाची कागदपत्रे स्कॅन करून या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. मुंबईतील सर्व मालमत्तांच्या संदर्भातील करविषयक कागदपत्रे या एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.

जकात नाके झाले संगणकीकृत

71जकात नाक्यांच्या दैनंदिन कारभारात होणारी आर्थिक उलाढाल लक्षात घेता, या ठिकाणी गोंधळ होऊ नये म्हणून पालिकेने जकात नाक्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणीही केली. संगणकीकरणामुळे जकात नाक्यांवर असलेल्या दलालांचा सुळसुळाटाला आळा बसणार आहे. त्यामुळे कामे पारदर्शक होण्यास मदत होईल, असे मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी सांगितले. जकात नाक्यावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा तपशील एकत्रितपणे ऑनलाईन ठेवण्यात येणार आहे. घरबसल्या किंवा कार्यालयातून जकात भरण्याची सोयही करण्यात आली आहे.

महापालिकेचे सक्षम सुरक्षा दल

8अवाढव्य मुंबईचा कारभार पाहणाऱ्या मुंबई महापालिकेची स्वत:ची सुरक्षा यंत्रणा असून या यंत्रणेचा स्वत:चा सशस्त्र विभाग आहे. या यंत्रणेमार्फत संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात येते.

मुंबईतील आधुनिक स्मशानभूमी

9अफाट लोकसंख्या असलेल्या मुंबईमध्ये स्मशानभूमींचा प्रश्नही तितकाच गंभीर बनला असता, मात्र उपलब्ध असलेल्या स्मशानभूमींचे आधुनिकीकरण करण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाने कंबर कसली आणि बव्हंशी स्मशानभूमींचा चेहरा-मोहरा बदलून टाकला असून अनेक स्मशानभूमींमध्ये मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. महापालिकेकडे व्यवस्थापन असलेल्या ४६ स्मशानभूमींपैकी सहा संयुक्त स्मशानभूमी आहेत. या स्मशानभूमींमध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मीयांसाठी अंत्यविधीची व्यवस्था उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे पालिकेच्या ११ विद्युत दहनभूमीसुद्धा आहेत.

पालिकेला राष्ट्रीय पातळीवरील ‘एक्सलन्स अॅवॉर्ड’

10अफाट लोकसंख्येच्या मुंबईकरांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्याकडे मुंबई महानगरपालिकेच्या काही योजनांची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. त्यापैकी एक म्हणजे गोराईमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यात आलेली क्षेपणभूमी. या पद्धतीचा अवलंब करणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका ठरली असून २०१० साली या प्रकल्पाची राष्ट्रीय पातळीवरील ‘एक्सलन्स अॅवॉर्ड’साठी निवड झाली. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार तत्कालीन आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी स्वीकारला.