नागरिकांचे आरोग्य सांभाळणे हे महापालिकेचे मुलभुत कर्तव्य असुन महानगरपालिकेचे दवाखाने, प्रसुतीगृहे आणि उपनगरीय रुग्णालये आदि ठिकाणी आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यात येऊन नागरिकांना चांगली आरोग्य सेवा दिली जात आहे. डेंग्यु, लेप्टो, स्वाईन फ्लू यासारख्या जीवघेण्या आजारांवरही मात करण्यात यश मिळवले आहे

“आरोग्यम धन संपदा”

दीड कोटीहुन अधिक लोकसंख्या असलेल्या या मुंबई शहराचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी मुंबई महापालिकेतर्फ़े कसुन प्रयत्न करण्यात येतात. याच प्रयत्नांचा भाग म्हणून मुंबईतील महापालिका रुग्णालये अद्ययावत सेवांनी सज्ज करण्यात आली. यामुळे मुंबईतील गोरगरीब जनतेला भक्कम आधार मिळाला. महापालिकेच्या केईएम रुग्णालयात झालेल्या यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेने पालिकेच्या शिरपेचार अजुन एक मानाचा तुरा खोवला. खासगी रुग्णालयात २५ ते ३५ लाख रुपये खर्चुन ही शस्त्रक्रिया होते. पालिकेच्या रुग्णालयात मात्र केवळ सहा लाख रुपये खर्चात ही शस्त्रक्रिया पार पडली. तब्बल १६ तास चाललेल्या या यशस्वी शस्त्रक्रियेची दखल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतली. रुग्णालयाला एक लाख रुपयांची देणगी दिली आणि केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय ओक यांचा सत्कार केला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन शिवसेनेने रक्तदानाचा महायज्ञ करण्याचा संकल्प केला. या महाशिबीरात शिवसैनिकांच्या दातृत्वामुळे तब्बल २५,०६५ बाटल्या रक्त जमा झाले आणि एक आगळावेगळा विश्वविक्रमच या निमित्ताने स्थापन झाला. रक्ताचे नाते रक्ताशी जोडण्याचे अलैकिक काम शिवसेनेने केले, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. मलेरिया आणि स्वाइन फ्ल्यु या रोगांच्या नियंत्रणासाठी पालिकेने उपाययोजना केल्या. त्याचा परिणाम लगेचच दिसुन आला. मलेरियाच्या रुग्णांमध्ये ५० टक्क्यांची घट दिसुन आली तर स्वाइन फ्ल्यु या रोगाची बाधा केवळ ६ रुग्णांना झाली. मधुमेहावर उपचार करण्य़ासाठीही पालिकेने विशेष पावले उचलली. एकुणच मुंबई निरोगी राहावी आणि मुंबईकरांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी मुंबई महानगर पालिकेने केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत.

के.ई.एम. रुग्णालयात पहिली यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

health11मुंबई महानगरपालिकेच्या के.ई.एम. रुग्णालयात पहिली यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया २००९ च्या जूनमध्ये यशस्वीपणे पार पडली आणि संपूर्ण देशभरातून के.ई.एम. चे अधिष्ठाता डॉ. संजय ओक आणि मुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या प्रामाणिक हेतूकडे पाहता शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना अपेक्षित असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी स्वत: लक्ष घातले आणि ही पहिलीवहिली शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात महानगरपालिकेला यश आले.

अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज मुंबईची रुग्णालये

heath21रुग्णांना अद्ययावत सेवा पुरविता यावी यासाठी मुंबई महापालिकेचे भाभा रुग्णालय (कुर्ला), भाभा रुग्णालय (वांद्रे), राजावाडी रुग्णालय (घाटकोपर), के.ई.एम. रुग्णालय (परळ) आणि नायर रुग्णालय (मुंबई सेंट्रल) ही रुग्णालये आधुनिक करण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी सर्व विभागांच्या सेवा एकाच ठिकाणाहून पुरविण्यात येतात. एकट्या के.ई.एम. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात गेल्या वर्षभरात १६,०३,५२९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावरुनच या के.ई.एम. रुग्णालयांची कार्यक्षमता लक्षात येऊ शकते.

मलेरियाच्या रुग्णांमध्ये ५० टक्क्यांची घट

health31२०१० साली मलेरियाने घातलेल्या थैमानात तब्बल ७६००० रुग्णांना या रोगाची बाधा झाली होती. २०११ साली मात्र पालिकेने या रोगाविरुद्ध दंड थोपटले. या वर्षी मलेरियाच्या रुग्णांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक घट होऊन ही संख्या ३६००० आली. पालिकेच्या या मोहिमेसाठी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: लक्ष घालून पाठपुरावा केला. पालिकेच्या या कामाचे कौतुक केंद्राकडूनही करण्यात आले. याचप्रमाणे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या जीवघेण्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात अद्ययावत रक्त तपासणी केंद्र (मॉलिक्युलर लॅब) उभारणारी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका आहे.

सुसज्ज बाह्यरुग्ण विभाग

health41मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालय (घाटकोपर), भाभा रुग्णालय (कुर्ला), शताब्दी रुग्णालय (कांदिवली) नायर रुग्णालय (मुंबई सेंट्रल) या ठिकाणाच्या बाह्यरुग्णविभागांचे आधुनिकीकरण करण्यात आले. या ठिकाणी आलेल्या रुग्णाला आवश्यक त्या सर्व चाचण्या आणि इतर वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी पुरविण्यात येतात. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड असते. हे रुग्ण बहुदा दुर्बल आर्थिक गटातील असतात. बाह्यरुग्णविभागांचे आधुनिकीकरण केल्यामुळे या गोरगरीब रुग्णांना तातडीने आणि उत्तम वैद्यकीय सेवा पुरविणे पालिकेला शक्य झाले आहे.

अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटर

health51मुंबईमध्ये अत्याधुनिक रुग्णालये उभारतानाच रुग्णांना तिथे मिळणाऱ्या सोयी-सुविधाही तशाच चांगल्या मिळाव्यात यासाठी अत्याधुनिक ट्रॉमा केअर सेंटरचीही उभारणी करण्यात आली.

डायलिसीस सेंटर लालबाग

health61लालबागचा राजा डायलिसीस सेंटरसाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून भूखंड व इमारत उपलब्ध करुन देण्यात आली. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ संस्थेतर्फे हे केंद्र चालविण्यात येत असून या डायलिसीस सेंटरमध्ये अत्यल्प दरात डायलिसिस सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते. महागड्या वैद्यकीय सुविधा न परवडणाऱ्या सामान्य माणसाला या केंद्रामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सामान्यांना उपयोगी पडेल, अशा कोणत्याही कार्याला शिवसेनेतर्फे नेहमीच प्रोत्साहन व सहकार्य करण्यात येते.

स्टेम सेल जेनेटिक रिसर्च सेंटर, एल.टी.एम.जी. रुग्णालय

health71एल.टी.एम.जी. (शीव) रुग्णालयामध्ये स्टेम सेल जेनेटिक रिसर्च सेंटरची उभारणी करण्यात आली असून मुंबईकरांना आरोग्य सुविधा देण्याच्या बाबतीतील हे एक पुढचे पाऊल ठरले आहे.

मागठाणे (बोरिवली) येथील बाल व माता रुग्णालय

health81महिला आणि बालकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माफक दराने विशेष वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी मुंबईतील मागठाणे, बोरिवली येथे माता बाल रुग्णालयात बाल व स्त्रीरोग चिकित्सेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. नोव्हेंवर २०१० मध्ये या रुग्णालयाचे उद्अ8घाटन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.

बाल शल्य चिकित्सा केंद्र

health91मुले ही उद्याच्या भारताची आधारस्तंभ असतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य जपणे हे आपले कर्तव्य मानून शिवसेना-भाजपा युतीने मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध उपक्रम राबवले असून पालिका रुग्णालयांमधील बाल शल्य चिकित्सा केंद्रे सुसज्ज करण्याला प्राधान्य देण्यात आले.