संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाबाबतीतले स्मृतिदालन, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान-प्राणिसंग्रहालय, भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय, पालिकेची नाट्यगॄहे, क्रीडा संकुले, ओझोन प्रकल्प, शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण, दादर चौपाटीवर उभारण्यात आलेले गणेशद्वार आदींमुळे मुंबईची शान वाढतच आहे. यापैकी प्रत्येक वास्तू एकमेवाद्वितीय आहे.

मुंबईच्या शिरपेचात मानाचे तुरे

मुंबईचा इतिहास म्हटले की, सर्वप्रथम मनात येते ते संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, कारण याच आंदोलनाचे आणि मराठी माणसाने सांडलेल्या रक्ताने मुंबईसह महाराष्ट्र स्थापन झाला. या आंदोलनाच्या स्मृती कायम जतन व्हाव्यात याच उद्देशाने मुंबई महापालिकेतर्फ़े दादर येथील शिवाजी पार्कजवळ संयुक्त महाराष्ट्र दालन उभारण्यात आले आहे. विविध शिल्प व चित्रकृतींच्या माध्यामातून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास जिवंत करण्यात आला आहे. मुंबईच्या संस्कृतीचे विविध पैलू आहेत. ही संस्कृती जशी मराठी माणसाची आहे, तशीच ती क्रिकेटचीसुद्धा आहे. ही विविधांगी संस्कृती जपण्याचा प्रयत्न शिवसेना नेहमीच करते. याच वर्षी हिंदुस्थानने विश्वचषकाला गवसणी घातली. त्याच वेळी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुंबईत क्रिकेट गॅलरी उभारण्याची घोषणा केली होती. ही केवळ घोषणा नसून क्रिकेट गॅलरी अर्थात क्रिकेटचे वस्तुसंग्रहालय अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडासंकुलात उभारण्याची योजना पूर्णत्वास येत आहे. १९८३ ते २०११ पर्यंतचा विश्वचषकाचा इतिहास या वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळणार आहे. क्रीडाक्षेत्रात मुंबईचा आणि महाराष्ट्राचा ठसा उमटावा यासाठी दादरच्या महात्मा गांधी जलतरण तलावाचे नूतनीकरण करण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा जलतरण तलाव तयार करण्यात आला. केवळ नावापुरते सुशोभीकरण नव्हे तर ज्यातून एखाद्या वास्तूचे सौंदर्य अजून खुलून येईल, अशा प्रकारचे प्रकल्प शिवसेनेच्या नेतॄत्वाखाली काम पाहणाऱ्या पालिकेने पार पाडले आहेत. शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वारचे सुशोभिकरण, दादर चौपाटीवर उभारण्यात आलेले गणेशद्वार ही उदाहरणे देता येतील. यापैकी प्रत्येक वास्तू एकमेवाद्वितीय आहेत. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईची शान वाढतच जात आहे.

उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेले संयुक्त महाराष्ट्र स्मृतिदालन

mumbaichi-shaan-14शिवसेना कार्यप्रमुख मा. श्री. उध्दवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून संयुक्त महाराष्ट्र स्मृतिदालन साकारण्यात आले आहे. मुंबईसह महाराष्ट्र मिळविण्यासाठी सामान्य मराठी माणसांनी दिलेला लढा कसा होता ते विविध तैलचित्रे, शिल्पे, छायाचित्रे यांच्या माध्यमातून जिवंत करण्याचा प्रयत्न या दालनात करण्यात आला आहे. प्रत्यक्ष लढा सुरू झाल्यापासून ते १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राचा मंगलकलश मुंबईत आणण्यापर्यंतचा संपूर्ण इतिहास हा या स्मृतिदालनात मांडण्यात आला आहे.

दादर चैत्यभूमीचे सुशोभीकरण

mumbaichi-shaan-21शिवसेना-भाजप युतीच्या कारकीर्दीत दादर येथील चैत्यभूमी परिसराचे सुशोभीकरण अत्यंत सुबक पद्धतीने करण्यात आले. त्याच्या प्रवेशद्वाराला सांची स्तुपाचा आकार देण्यात आला आहे. ६ डिसेंबर रोजी या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी येतात. लाखोंच्या संख्येने आलेल्या डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये म्हणून पालिकेकडून प्रयत्न करण्यात येतात. बेस्टतर्फे मोफत वीज, बससेवा तसेच पालिकेतर्फे पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे आणि आरोग्य चिकित्सेसारख्या सेवा पुरविण्यात येतात.

नूतनीकरण करण्यात आलेले भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय, जिजामाता उद्यान, भायखळा

mumbaichi-shaan-31इतिहास, भूगोल, कला, साहित्य, संस्थानं याबद्दलची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, या हेतूने हे वस्तुसंग्रहालय निर्माण करण्यात आलं होतं. १९७५ मध्ये या वस्तुसंग्रहालयाला भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय असे नाव देण्यात आले. त्यानंतर अगदी अलीकडे २००३ आणि २००७ मध्ये हे वस्तुसंग्रहालय मुंबई महापालिकेच्या हेरिटेज विभागाच्या देखरेखीखाली काटेकोरपणे पुनर्रचित करण्यात आले. या कामी जमनालाल बजाज ट्रस्टचे सहाय्य मिळाले. मुंबई महानगरपालिकेने अलीकडेच नूतनीकरण करून त्यांची भव्यदिव्यता राखून ते पुन्हा एकदा सर्वसामान्य मुंबईकरांच्या हवाली केले. श्री. उध्दव ठाकरे यांच्या शुभहस्ते या संग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आले.

मुलुंड येथील जलतरण तलाव

mumbaichi-shaan-41मुंबईतील उपनगरांतील रहिवासी आणि खेळाडू यांना योग्य त्या सुविधा प्राप्त व्हाव्यात, हाच पालिकेचा प्रयत्न असतो. काही वर्षांपूर्वी एक कोटी साठ लाख रुपये खर्चून पालिकेने मुलुंड येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी जलतरण तलावाचे नूतनीकरण केले.

शिवतीर्थ (शिवाजी पार्क) येथील प्रवेशद्वारांना आधुनिक स्वरूप

mumbaichi-shaan-51मुंबईतील अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या दादर येथील शिवतीर्थाचे सुशोभीकरण करण्यात आले. शिवतीर्थाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर शिवकालीन स्मृतिशिल्पे तसेच विविध क्षेत्रांची ओळख करून देणारी शिल्पे बसविण्यात आली आहेत. शिवसेना-भाजप युतीच्या प्रयत्नांतून झालेल्या या सुशोभीकरणात शिवमुद्रेची प्रतिकृती, भाला हाती घेतलेले मावळे, तुतारीवाला, भालदार-चोपदार, शरीरसौष्ठवपटू, लॉन टेनिसपटू, जॉगिंग करणारे, स्काउट गाईड, फुटबॉलपटू आणि क्रिकेटपटू अशी १४ शिल्पे बसविण्यात आली आहेत.

आंतरराष्ट्रीय दर्जाचा महात्मा गांधी जलतरण तलाव, शिवाजी पार्क, दादर

mumbaichi-shaan-61१० रांगांचा, ५० मी. x २५ मी. x १.६० मी (सरासरी कमीत कमी खोली १ मी असून जास्तीत २.२० मी, खोल) असा ऑलिम्पिक व फिना मानकाप्रमाणे मोजमापे असलेला ‘रेसिंग पुल’ ऑलिम्पिक व फिना मानकाप्रमाणे वेगवेगळ्या उंची असलेला ‘डायव्हिंग बोर्ड’ व ‘स्प्रिंग बोर्ड’ २५ मी x २२ मी x ५ मी खोली असलेला अद्ययावत असा डायव्हिंग पूल
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेपूर्वी खेळांडूना ‘वॉर्मअप’ करण्यासाठी व नवागतांना शिकवण्यासाठी ऑलिम्पिक व फिना मानकानुसार ५० मी. x २५ मी. x १.६० मी (सरासरी खोली) या मापांचा अद्ययावत ‘वॉर्मअपस पूल’ जलतरण संकुलामध्ये ४ वर्षापर्यंतच्या मुलांकरिता ०.४५ मी. खोलीचा (कमी खोलीचा) जलतरण तलाव व त्याभोवती मुलांना इजा होऊ नये म्हणून रबरयुक्त मऊ लादी जलतरण तलाव संकुलाच्या सभोवताली पाय घसरू नये म्हणून खास बनविण्यात आलेल्या लाद्या.

मुंबईचे शानदार प्रवेशद्वार, दहिसर

mumbaichi-shaan-71मुंबईत प्रवेश करतानाच मुंबईच्या भव्यतेची झलक दाखविणारी दहिसर प्रवेशद्वाराची रचना करण्यात आली आहे. गॉथिक शैलीत तयार करण्यात आलेल्या या प्रवेशद्वाराचे स्वरूप मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीशी मिळतेजुळते आहे.

गेट वे ऑफ इंडीया हेरिटेज परिसराचे सुशोभिकरण

mumbaichi-shaan-81गेट वे ऑफ इंडिया हा तर मुंबईचा मानबिंदू. दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी येतात. गेट वे ऑफ इंडियाचे सौंदर्य अधिक खुलून दिसावे यासाठी पालिकेने या परिसराचे सुशोभिकरण केले.

प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर बोरिवली

mumbaichi-shaan-91दहा महिन्यांचा कालावधी आणि सात कोटी साठ लाख रुपये खर्चून पालिकेने बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात अद्ययावत ध्वनियंत्रणा, ग्रीन रुम, आसनव्यवस्था, कलादालनाचेही नूतनीकरण करून या नाट्यगृहाला नवे स्वरूप दिले. गिरगाव चौपाटीजवळील राजा डॉ. बलदेवदास बिर्ला क्रीडा केंद्र, शिवडी येथील प्रबोधनकार ठाकरे रंगमंच, विलेपार्ले (पू.) येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, मालाड (पू.) येथील स्वरसम्राट कुंदनलाल सैगल महानगरपालिका खुले नाट्यगृह यांच्या माध्यमातून साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य महापालिका करते.

वारकऱ्यांसाठी मुंबईमध्ये हक्काचे ‘वारकरी भवन’

mumbaichi-shaan-101महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी लाखो भाविक पंढरीची वारी करत असतात. माऊलीची अविरत सेवा करणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या लोअर परळ येथे हक्काचे असे वारकरी भवन मुंबई महानगरपालिकेद्वारे बनविण्यात आले. सर्व सोयीसुविधांनी युक्त अशा या वारकरी भवनात अभंग, कीर्तन याकरिता एक प्रशस्त सभागृहसुध्दा बांधण्यात आले आहे.

विश्वविजेत्या हिंदुस्थानाच्या विजयाचे अनमोल क्षण जतन करणारी विश्वचषक गॅलरी

mumbaichi-shaan-111शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुंबईत क्रिकेट गॅलरी उभारण्याची घोषणा केली. त्यानुसार क्रिकेट
गॅलरी अर्थात क्रिकेटचे वस्तुसंग्रहालय अंधेरी येथील शहाजी राजे क्रीडासंकुलात उभारण्याची योजना पूर्णत्वास आली आहे. १९८३ ते २०११ पर्यंतचा विश्वचषकाचा इतिहास या वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळाणार आहे.

दादर चौपाटीवरील भव्य गणेशद्वार

mumbaichi-shaan-121मुंबई महापालिकेतर्फे दादर चौपाटीवरील भव्य ‘बी.ए.पी.एस. स्वामीनारायण गणेशद्वार’ उभारण्यात आले आहे. या गणेशद्वारावर १००८ गणेश शिल्पकृती बसविण्यात आल्या असून या मूर्ती राजस्थानातील बन्सीपहाडपूर येथील दगडातून कोरण्यात आल्या आहेत. यांचे वैशिष्ट्य असे की या सर्व मूर्तींचा आकार, मुद्रा आणि सरोद, वीणा, सतार इत्यादी वाद्ये धरण्याची शैली वेगवेगळी आहे. तोरण, कमान, घुमट, खांब, पायासाठी १२ ते २८ इंचाचे १,२८५ दगड कोरीव काम करून या.