संस्कृतीची जपणूक आणि न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणारी, रक्ताचे नाते रक्ताने जोडणारी अशी ही शिवसेना. सामाजिक कार्य असो, संस्कृती असो वा संघर्ष, शिवसेनेने नेहमीच मराठी बाणा, मराठी माणसाचे हित आणि मराठी माणसाचा आनंद जपला आहे.

शिवसेना जपणूक संस्कृतीची आणि संघर्ष न्याय्य हक्कांसाठी

८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असाच शिवसेनेचा लौकिक आहे. हा लौकिक सार्थ करत संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शिवसेनेने रक्तदानाचा महायज्ञ आयोजित केला होता. या महारक्तदान शिबिरात तब्बल २५,०६५ बाटल्या रक्त जमा झाले आणि एक विश्वविक्रम स्थापन झाला. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली. सामाजिक कार्य असो, संस्कृती असो वा संघर्ष…शिवसेनेने नेहमीच मराठी बाणा, मराठी माणसाचे हित आणि मराठी माणसाचा आनंद जपला आहे. मुंबईतील विविध उपनगरांमध्ये भरविण्यात येणारे कोकण महोत्सव ही त्याचीच प्रतीके आहेत. कामाच्या निमित्ताने मुंबईत आलेल्या कोकणी माणसाना कोकणचा मेवा मिळावा आणि मुंबईकरांना कोकणी संस्कृतीशी जवळीक साधता यावी, हा या महोत्सवांचा उद्देश आहे. केवळ आनंद सोहळे नव्हे तर येथील पिचलेल्या, शोषित जनतेच्या पाठीशी शिवसेना नेहमीच उभी राहाते. कापुस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे कापूस दिंडीत सहभागी झाले होते. जैतापुर येथे होऊ घातलेल्या अणुप्रकल्पामुळे कोकणाचे आणि कोकणी माणसाचे नुकसान होऊ नये म्हणून शिवसेनेने या प्रकल्पाला विरोध करत शिवसेनेने जैतापूर रॅलीचे आयोजन केले होते. त्याचप्रमाणे मुंबईतील गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी शिवसेनेने मुंबईत मोर्चा काढला होता. शिवसेनेप्रमाणेच युवासेनाही तरुणांच्या हक्कांसाठी नेहमीच लढते. चिनॉय महाविद्यालय व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरुद्ध युवासेनेने सतत आंदोलन छेडले आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रश्न तडीस लावण्यासाठी युवासेना सतत संघर्ष करत आहे.

रक्तदान शिबिरात शिवसेनेचा विश्वविक्रम

sanghatana-1रक्तदान हे श्रेष्ठदान ही उक्ती कृतीत आणण्याचे शिवसेनेने ठरविले आणि तसे ते प्रत्यक्षातही आणले. शिवसेनेचा हा उपक्रम म्हणजे लहानसे रक्तदान शिबीर नसून तो रक्तदानाचा महायज्ञ होता. रक्तदानाच्या या महायज्ञात तब्बल २५,०६५ बाटल्या रक्त जमा झाले आणि एक अनोखा विश्वविक्रमच घडला. २४ एप्रिल २०११ रोजी सकाळी सात वाजता गोरेगाव येथील एनएसई संकुलात येणाऱ्या रक्तदात्यांच्या गर्दीवरुन हा विश्वविक्रम होणार हे स्पष्टच झाले होते. रक्ताचे नाते रक्ताशी जोडण्याचा शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांचा संकल्प विश्वविक्रम होऊन प्रस्थापित झाला. सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्राला शिवसेनेने केलेले हे अभिवादन सर्व जगाला अचंबित करुन गेले !

मराठी उद्योजकांना प्रोत्साहन व मार्गदर्शनासाठी भव्य ‘गर्जतो मराठी’

sanghatana-2jpgमराठी माणसाचे हित जपण्याचा वसा जपताना शिवसेनेने उचललेल्या दमदार पावलांमधील एक जबरदस्त ‘इव्हेन्ट ठरलेले’ ‘गर्जतो मराठी’ हे शिक्षण, उद्योग आणि निवाऱ्यावरील प्रदर्शन आणि चर्चासत्र लाखो मराठी बांधवांना ‘नेस्को’ संकुलाकडे आकर्षित करण्यात यशस्वी झाले. पाच दिवसांचा महोत्सव लक्षावधी बांधवांना आनंद आणि प्रेरणा देणारा ठरला.

कोकणची चव मुंबईत देणारा मालवणी जत्रोत्सव

sanghatana-3कोकणाची कला, चवदार खाद्य पदार्थ, हस्तकलेच्या वस्तूंना मुंबईची विशाल बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शिवसेनेने सुरु केलेल्या मालवणी जत्रांनी मुंबईच्या सांस्कृतिक जगतात वेगळे स्थान निर्माण केले. कोकणी उद्योजकांसाठी ही मोठी संधी ठरली आहे, अशा जत्रांची संपूर्ण मुंबई महानगरातील एक मालिकाच उभी राहिली.

मराठमोळी दिवाळी पहाट

sanghatana-4मुंबईच्या सांस्कृतिक चळवळीत लोकप्रिय झालेल्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचा आनंद नव्याने सुरु झालेल्या सुंदर जलतरण तलावाच्या परिसरात हजारो मराठीजनांसाठी आनंदाची पर्वणी ठरला. दीपावलीच्या मुहूर्तावर शिवरायांच्या पुतळ्यावर देशातून आणलेल्या विविध नद्यांच्या जलाचा अभिषेक उद्धवजींनी सपत्नीक केला.

संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाचा शानदार सोहळा- ‘गर्जा जयजयकार’

sanghatana-5१ मे २०१० या दिवशी आपल्या महारष्ट्र राज्याला ५० वर्षे पूर्ण झाली. हुतात्य्मांना वंदन करण्यासाठी शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांद्रे-कुर्ला संकुलात अतिभव्य कार्यक्रमाचे आयोजन केले. प्रत्यक्ष गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर आणि पंडित हृदयनाथांनी माननीय शिवसेनाप्रमुखांच्या आणि शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत ‘बहू असोत सुंदर संपन्न की महा’ ही ऐतिहासिक कविता सादर करुन उपस्थित लाखो महाराष्ट्रप्रेमींना मंत्रमुग्ध केले.

३१ वर्षे अखंडितपणे बँक नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग

sanghatana-6शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघामार्फत गेली ३१ वर्षे अखंडितपणे बँक भरतीकरिता प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात येत असून त्याचा लाभ लाखो तरुण-तरुणींना झालेला आहे.

महागाई, भ्रष्टाचार व दलित अत्याचाराच्याविरोधात महायुतीची महारॅली

sanghatana-7सध्या महागाई गगनाला भिडलेली आहे, भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे आणि दलित अत्याचारांमध्येही वाढ झालेली आहे. याविरोधात महायुतीची महारॅली काढण्यात आली. या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला.

मुंबई विकणाऱ्या आघाडी सरकार विरोधात महामोर्चा

sanghatana-8यू.एल.सी. कायदा रद्द करुन आघाडी सरकारने सर्वसामान्यांच्या घरांसाठी मिळू शकणाऱ्या जमिनी बिल्डरांना मोकळ्या केल्या. त्याविरुद्ध शिवसेनेने उठवलेला आवाज आवाज अतिभव्य मोर्चातून प्रकट झाला. माहीम ते वांद्रे निघालेल्या महामोर्चात लाखोंनी सामील होऊन ‘म्हाडा’वर धडक दिली. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील गिरणी कामगारांचे योगदान विसरता येण्यापलीकडचे आहे, या भावनेने गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळालीच पाहिजेत या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाचे नेतृत्त्व केले.

शिवसेनेचा संघर्ष न्याय्य हक्कांसाठी

sanghatana-9सामान्य जनतेच्या संसाराची राखरांगोळी करणारा जैतापूर प्रकल्प हद्दपार करण्यासाठी शिवसेना तुमच्या पाठीशी उभी आहे. अशी ग्वाही शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी दिली आहे. यासाठी ते स्वतः जैतापूरच्या दौऱ्यावर गेले. तेथील शेतकरी, मच्छिमार, बागायतदार, व्यावसायिक यांच्याशी चर्चा केली. आणि हा प्रकल्प हद्दपार करण्याची जाहीर घोषणाही त्यांनी यावेळी केली. जैतापूर प्रकल्पाविरोधातील आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या अमानुष गोळीबारात बळी पडलेल्या तबरेजच्या घरी जाऊन शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आणि त्यांना धीर दिला.

संघर्ष शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी

sanghatana-10शिवसेना सातत्याने शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करत आली आहे. चार वर्षांपूर्वी विदर्भात शिवसेनेतर्फे कर्जमुक्ती मेळाव्याचे आयोजन केले होते. शिवसेनेने दिलेल्या हाकेला शेतकऱ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. उसाचा प्रश्न लावून धरला आणि शेतकऱ्यांना भाव वाढवून दिले. तसेच कापसाला भाव मिळावा म्हणून शिवसेनेने पाच जिल्ह्यांत कापूस दिंडी काढली. उध्दव ठाकरे यांनी स्वतः या दिंडीचे नेतृत्त्व केले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत आली आहे.

युवासेनेची सुसाट एक्सप्रेस

sanghatana-11मुंबईतील लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव डबे असावेत, अशी मागणी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे केली. याबाबतची व्यवहार्यता तपासून या मागणीबाबत विचार करण्यात येईल, असे तत्कालीन ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

युवा सेनेची युवा सेवा

sanghatana-12अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी जुहू चौपाटीवर स्थानिक शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन युवा सेनेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती आणि अलिकडेच युवासेनेतर्फे अंधेरीत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रकारच्या आरोग्यसेवा या ठिकाणी पुरविण्यात आल्या होत्या. या शिबिराचा हजारो आबालवृध्दांनी लाभ घेतला.

चिनॉय कॉलेजच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी पुढे सरसावले युवा नेतृत्व

sanghatana-13धनदांडग्या मालकांना कॉलेज बंद करुन ’मॉल’ उभारायचा आहे, हे समजूनही आणि सामान्य घरातील मुलांच्या उच्च शिक्षणाची संधी हिरावली जात असताना राज्य सरकार ठोस उपाय करण्यात अपयशी ठरले. पण या हजारों मुलांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली ती आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील युवा सेना!