रस्ते ही शहरासाठीची मुख्य व पायाभुत सुविधा असुन वाढत जाणारे वाहतुकीचे प्रमाण आणि भार लक्षात घेऊन महापालिकेने महत्त्वाच्या रस्त्यांचे आणि जोडरस्त्यांचे काँक्रिटीकरण केले असुन आतापर्यंत सुमारे ५०६.४६ कि.मी. रस्त्यांचे काँक्रिटीकरण झालेले आहे. तसेच अनेक रस्त्यांचे डांबरीकरण व पेव्हर ब्लॉकचे काम करण्यात आले आहे.

जलद आणि सुखद प्रवासासाठी

रस्ते ही मुंबईतील एक मुख्य सुविधा आहे. मुंबईकरांचा प्रवास सुखद व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेने विशेष प्रयत्न केले आहेत. अलीकडेच पालिकेने मुंबईतील रस्त्यांच्या डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतले. या प्रकल्पाअंतर्गत मुंबईतील १६१ रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीच्या कामासाठी ५५० कोटी रुपयांची विशेष तरतुदही पालिकेतर्फ़े करण्यात आली. ही कामे करताना पालिकेने आपल्या अभियंत्यांवर विशेष जबाबदारी दिली आहे. ती म्हणजे प्रत्येक अभियंत्याला रस्त्याचे पालकत्व देण्यात आले आहे. त्यामुळे त्या रस्त्याचे काम कशाप्रकारे होत आहे, यावर त्या अभियंत्याला लक्ष ठेवावे लागणार आहे. गेल्या ५ वर्षात सुमारे ३५ कि.मी रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले, तसेच १७६ कि.मी. रस्त्यांचे आणि पेव्हर ब्लॉक रस्त्यांचे रुंदीकरण व सुधारणा करण्यात आली. युतीचे सरकार असताना ५५ उड्डाणपुल बांधले होते. पुलांचे महत्व ओळखुन पालिकेची १२ उड्डाणपुलांची कामे प्रगतिपथावर आहेत. पालिकेने उचललेल्या या पावलामूळे कंत्राटदारांवर पालिकेच्या अभियंत्यांची करडी नजर राहणार आहे. त्यामुळे या कामात कोणत्याही प्रकारची चालढकल होणार नाही, याची दक्षता पालिकेतर्फ़े घेण्यात आली आहे. रस्ते अधिकाधिक काळ टिकुन राहावेत यासाठी या बांधकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. मुंबईत बांधलेल्या रस्त्यांची भुरळ बाहेरील राज्यांनाही पडली. बिहारने रस्तेबांधणीसाठी “मुंबई पॅटर्न” अवलंबायचे ठरविले. त्यानुसार पालिकेचे अभियंते बिहारला जाऊन या तंत्रज्ञानाची माहिती देऊन आले. वाहन चालकांप्रमाणेच पादचाऱ्यांचीही काळजी पालिकेने घेतली आहे. मुंबईतील रस्त्यांवरील वाहनांची संख्या लक्षात घेता, जिथे वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणावर आहे, त्या ठिकाणी पालिकेने भुयारी रस्ते बांधले आहेत.

काँक्रिटीकरणाला दिले प्राधान्य

raste11पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडून वाहतुकीचा खोळंबा होतो आणि मुंबईकरांचे हाल होतात, ही बाब लक्षात घेऊन मुंबईतील रस्ते टिकाऊ राहावेत यासाठी सिमेंट काँक्रिटचे रस्ते बांधण्याला पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाने प्राधान्य दिले. अलीकडेच यासंदर्भात पालिका आयुक्तांनी दीर्घकालीन धोरण जाहीर केले आणि लगेचच त्याची अंमलबजावणीही केली.

रस्त्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान

raste21रस्ते ही महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे, ही बाब लक्षात घेऊन पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाने रस्ते विकासाच्या मुद्दयाला नेहमीच प्राधान्य दिलेले आहे. रस्ते अधिकाधिक काळ टिकून राहावेत, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे पालिकेने ठरविले व अल्ट्राथीन टॉपिंग पध्दतीचा वापर या कामासाठी केला. वरळी आणि मुलुंड येथील रस्ते याच पध्दतीचा अवलंब करून बांधण्यात आले. मुंबईत बांधलेल्या रस्त्यांची भुरळ इतर राज्यांनाही पडली. बिहारनेही मुंबई महापालिकेचे अनुकरण करण्याचे ठरविले आहे.

काँक्रिटीकरण झालेले रस्ते

raste31मुंबईमध्ये पावसाळ्यात रस्त्यांना खड्डे पडण्याचे प्रकार वारंवार घडतात. यावर उपाययोजना म्हणून सिमेंट काँक्रिटचे रस्ते बांधण्याला पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाने प्राधान्य दिले. आतापर्यंत सुमारे ५०६.४६ किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले.

पादचाऱ्यांसाठी बांधले १४ भुयारी रस्ते

raste41मुंबईमध्ये होणारा वाहतुकीचा खोळंबा, रस्ते ओलांडताना होणारे अपघात, त्यातून नागरिकांचे जाणारे हकनाक बळी या साऱ्या बाबींचा विचार करून मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाने अनेक ठिकाणी पादचाऱ्यांसाठी भुयारी रस्ते बांधण्याचा निर्णय घेतला. यापैकी १४ भुयारी रस्ते बांधून पूर्ण झाले असून नागरिकांची त्यामुळे चांगलीच सोय झाली आहे.

जलद वाहतुकीसाठी उड्डाण पूल

raste51मुंबईत वाढणाऱ्या वाहनांची संख्या लक्षात घेता पालिकेने मुंबईत उड्डाणपूल बांधण्याला प्राधान्य दिले. सध्या एकूण बारा उड्डाणपुलांची कामे प्रगतिपथावर आहेत. हे पूल बांधल्यामुळे अपघातांमध्ये घट होईल आणि वाहनचालकांचे अडथळे कमी होतील अशी अपेक्षा आहे.