हिंदुत्व – हिंदुत्व करीत असताना शिवसेनेने मराठी मुद्दा काहीसा बाजूला ठेवला, मराठी माणसाला विसरली असा आरोप शिवसेना व शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांचे विरोधक करतात. शिवसेनेने मराठी भाषा, महाराष्ट्र व मराठीपण कधी सोडलेले नाही आणि कदापि सोडणार नाही. मराठीपण सोडण्याचा विचारही करणार नाही, हे बाळासाहेबांनी वेळोवेळी आपल्या भाषणांतून, अग्रलेखांतून आणि मुलाखतींमधून मांडले आहे.