कॅबिनेट मंत्री
अ.क्र.नावखाते
मा. सुभाष देसाईउद्योग, खणीकर्म
मा. दिवाकर रावतेपरिवहन, खारजमीन
मा. रामदास कदमपर्यावरण
मा. एकनाथ शिंदेसार्वजनिक बांधकाम (उपक्रम)
मा. डॉ. दीपक सावंतसार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण
राज्यमंत्री
अ.क्र.नावखाते
मा. संजय राठोडमहसूल
मा. विजय शिवतारेजलसंपदा व जलसंधारण
मा. दीपक केसरकरवित्त, ग्रामविकास, गृह (ग्रामीण)
मा. रवींद्र वायकरगृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण
मा. दादा भुसेसहकार
मा. गुलाबराव पाटीलसहकार
मा. अर्जुन खोतकरपशुसंवर्धन व दुग्ध, मत्स्यविकास, वस्त्रोद्योग

युती सरकारचे खातेवाटप – मंत्रालयावर युतीचे भगवे तोरण

शुक्रवार दि. ५ डिसेंबर २०१४ रोजी विधानभवनाच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याच्या साक्षीने युती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा धूमधडाक्यात आणि जल्लोषात संपन्न झाला. या शानदार सोहळ्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शिवसेना-भाजपच्या २० मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या ५ कॅबिनेट तर ५ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. महाराष्ट्रात युतीचे स्थिर सरकार आले.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भाजपाचे प्रभारी राजीवप्रताप रुडी, ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे, महसूल मंत्री एकनाथ खडसे, उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, शिवसेना नेते मनोहर जोशी, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे आणि विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनाप्रमुखांना वंदन
शिवसेनेच्या पाच कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्र्यांनी शपथ घेताना हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले. दिवाकर रावते यांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीला अभिवादन करून कॅबिनेट मंत्रीपदाच्या शपथेला सुरुवात केली. सुभाष देसाई यांनी शिवसेनाप्रमुखांना वंदन करून शपथ घेतली. रामदास कदम आणि एकनाथ शिंदे यांनीही शपथ घेताना शिवसेनाप्रमुखांना मानवंदना दिली. डॉ. दीपक सावंत यांनी शिवसेनाप्रमुखांना मानाचा मुजरा करून आणि आईच्या स्मृतींना अभिवादन करून शपथ घेतली. राज्यमंत्री संजय राठोड, दादा भुसे, विजय शिवतारे, दीपक केसरकर, रवींद्र वायकर यांनी शिवसेनाप्रमुखांना वंदन करून आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रणाम करून शपथ घेतली.

एकत्र आलोय, एकत्र जनतेची सेवा करू!
आता एकत्र आलोय, एकत्र जनतेची सेवा करू आणि महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यास प्राधान्य देऊ. शिवसेना-भाजपची युती झाल्याने आता पुढील पाच वर्षे राज्यात चांगली कामे होतील. एकत्रितरीत्या राज्यातील विकासकामे मार्गी लावू, असे कॅबिनेटमंत्री रामदास कदम यांनी शपथविधी सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.