शेतकर्यांनो आत्महत्या करू नका… काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निर्लज्ज सरकारला फासावर लटकवा! शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे घणाघाती आवाहन

रामटेकच्या गडावर सोमवारी भगवे तुफानच अवतरले. गारपीट, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी गळफास घेत असताना हे कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे निर्लज्ज सरकार थंड आहे. शेतकर्‍यांनो तुम्ही आत्महत्या करू नका, या सरकारलाच गळफास लावून फासावर लटकवा, असे घणाघाती आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
(७ एप्रिल)
गारपीट, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी गळफास घेत असताना हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे निर्लज्ज सरकार थंड आहे. शेतकर्यांनो तुम्ही आत्महत्या करू नका, या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारलाच गळफास लावून फासावर लटकवा, असे घणाघाती आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.
रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार कृपाल तुमाने यांच्या प्रचारासाठी कन्नान येथील कानपूर केमिकलच्या भव्य मैदानावर दणदणीत सभा झाली. या वेळी उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेसच्या बेदरकार कारभाराचा खरपूस समाचार घेतला. भाषणाच्या सुरुवातीलाच ते म्हणाले, काँग्रेसला मत म्हणजे काळोखाला मत, मग तुम्ही काळोखाला मत देणार काय? तेव्हा गर्दीतून नाही नाहीचा आवाज घुमला.

  • मंगळ वक्री आला
    निवडणुका लागल्या आणि दिल्लीतील मंगळ गल्लीत वक्री आले आणि पायाला चक्री लागल्यासारखे फिरत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला, पण कृपाल तुमाने हा तुमच्यातला उमेदवार आहे. तुमची वेदना जाणणारा सर्वसामान्य माणूस आहे, त्यांनाच दिल्लीत पाठवा असे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले, आपले सरकार येणारच आहे, त्यानंतर शेतकर्‍यांना मिळणारे पैसे कोणाच्या खिशात गेले त्याचा शोध आम्ही लावणारच.
    ‘कोब्रा पोस्ट’चे बांडगूळ ठेचून काढूबाबरी मशीद पाडण्यासाठी शिवसैनिकांनी डिटोनेटर नेले असा आरोप करणार्या ‘कोब्रा पोस्ट’चाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ‘कोब्रा पोस्ट’चे बांडगूळ आता वळवळू लागले आहे. हा नामर्द ‘कोब्रा’ इतकी वर्षे कोणत्या बिळात बसला होता, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना हा कोब्रा तोंडात बोळा टाकून का बसला होता, असे जळजळीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केले. लोकांची मने भडकावण्यासाठीच काँग्रेसने हा कोब्रा आणला, असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच प्रचंड जनसमुदायातून शेम शेमच्या घोषणा घुमल्या.