धाराशीवच्या अतिविराट सभेत उद्धव ठाकरे यांचे आवाहन
काँग्रेस-राष्ट्रवादीची मोगलाई चिरडून टाका!

देवळात देव सुरक्षित नाही. दिवसाढवळ्या देवळे लुटली जात आहेत. महिलांची अब्रू धोक्यात आहे. जागे व्हा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची ही मोगलाई चिरडून टाका, असे जबरदस्त आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी धाराशीवच्या अतिविराट सभेत केले.
(८ एप्रिल)
देवळात देव सुरक्षित नाही. दिवसाढवळ्या देवळे लुटली जात आहेत. महिलांची अब्रू धोक्यात आहे. मस्तवालपणाने चिमुकले जीव चिरडले जात आहेत. जागे व्हा आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची ही मोगलाई चिरडून टाका. आतापर्यंत खूप भोगले, आता त्याचा हिशेब करण्याची वेळ आली आहे. वज्रमूठ आवळा आणि देशाच्या संसदेवर भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
धाराशीव येथे महायुतीचे उमेदवार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दणदणीत सभा झाली. ही अफाट गर्दी हेच शिवसेनेचे वैभव आहे. हे वैभव इतर पक्षांच्या नशिबी नाही. ही भाड्याची गर्दी नाही, तर जिवंत माणसांची गर्दी आहे. तुळजाभवानी मर्दांना आशीर्वाद देते. छत्रपती शिवरायांना तिने तलवार देऊन दुष्टांचा संहार करण्याचा आशीर्वाद दिला होता, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की, येतानाच तुळजापूरला दर्शनासाठी जाणार होतो. परंतु तुळजाभवानीला सांगून आलो, आधी मर्द मावळ्यांचे दर्शन आणि नंतर तुझ्या पायावर डोके टेकविण्यासाठी येईन. काय चालले आहे राज्यात? देवतांची विटंबना चालू आहे. दिवेआगरचा पेशवेकालीन गणपतीच चोरीला गेला. महिलांच्या अब्रूचे रोज धिंडवडे निघत आहेत. शिवरायांच्या अगोदरही राज्यात सत्ताधारी असाच मातला होता. त्या वेळी एकनाथांनी ‘बये, दार उघड’ अशी आर्त हाक दिली होती. आजही परिस्थिती तीच आहे. बये, तुला दिसत की नाही? आता तरी दार उघड’, अशी हाक उद्धव ठाकरे यांनी तुळजाभवानीला दिली.

 • खुनाचा आरोपी मते मागतोय
  आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील यांचा जोरदार समाचार घेतला. खुनाचा आरोप डोक्यावर असलेले पद्मसिंह मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. कुठे गेली तुमची मर्दानगी? तुम्ही शेळी आहात की वाघ? नुसत्याच घोषणा देऊन चालणार नाही. तुमचा नेभळटपणा पाहून तुळजाभवानीलाही लाज वाटेल की आपण कुठे आहोत? कुणाच्या घरात आहोत? अन्याय झाला असा आक्रोश करून गप्प बसणार आहात काय? तुळजाभवानीच्या तेजाला जागण्याची वेळ आता आली आहे. भवानीचा आशीर्वाद हा नामर्दाला मिळत नाही हे लक्षात ठेवा आणि गुंडगिरी ठेचण्यासाठी तुमच्यातील अंगार बाहेर पडू द्या, असे संतप्त आवाहन उद्धव ठाकरे यांनी या वेळी केले.

 • हिंदूंना जागे करणे गुन्हा नाही
  आम्ही हिंदुत्वावर बोललो की धर्मांध ठरतो. आचारसंहितेचा बुरखा पांघरून आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात. पण पलीकडे काय चालले आहे याचे चित्र मांडणे हा अपराध आहे का? हिंदू समाजाला जागे करणे हा काही गुन्हा नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
 • शरद पवार, तुमचा वारसा कोणता?
  उद्धव ठाकरे यांना राजकीय वारसा मिळाला आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली. त्याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या विधानाच्या चिरफळ्या उडवल्या. समोर बसलेले लाखो शिवसैनिक हा माझा वारसा आहे. शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेबांसारखे आई-वडील मला मिळाले ही माझी पुण्याई आहे. भगवा माझा वारसा आहे. तुमचा वारसा कोणता, असा खोचक सवाल त्यांनी या वेळी केला. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या शाई प्रकरणावरही झोड उठवली. गारपिटीने शेतकरी नाडला आहे. दुष्काळाचे संकट शेतकर्‍यांवर घोंघावत असताना शरद पवारांना विनोद सुचतो, असे खडे बोल त्यांनी सुनावले.
 • इनोव्हा… नॅनो… डबलसीट
  देशभरात आलेला परिवर्तनाचा झंझावात पाहून शरद पवार यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ‘इनोव्हा’त बसतील एवढ्या जागा मिळाल्या होत्या. आता नॅनोत. दोन ते चारच्या पुढे आकडा सरकत नाही. चार काय, या वेळेस राष्ट्रवादी सायकलवर डबलसीट येईल, असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.