• कला, क्रीडा, साहित्य, चित्रपटसृष्टी, नाट्यसृष्टी, उद्योजक, पत्रकार, राजकारण, समाजकारण या सर्व क्षेत्रात मैत्री आणि विषयांचा सखोल अभ्यास यांचा संगम म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • अमोघ वाणी – प्रभावी लेखणी आणि कुंचल्याचे मर्मभेदी फटकारे यांचा मिलाप म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • सर विन्स्टन चर्चिलवरील पुस्तकामध्ये व्यंगचित्राचा समावेश झाला असे एकमेव आशियाई वा भारतीय व्यंगचित्रकार म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • आपल्या कुंचल्याने मनमुराद हसायला लावणारे दुष्ट, सुष्ट, भ्रष्टांना दरदरून घाम फुटायला लावणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • शब्दाचे पक्के ! शब्द दिला की त्याची पूर्तता करेपर्यंत शांत न बसणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • ‘जे बोललो ते बोललो’! बोललोच नाही वा ऐकलेच नाही अशा राजकारणी दुर्गुणांना जवळपास फिरकण्याचे धाडसही ज्याच्याजवळ करता येणार नाही ते व्यक्तिमत्त्व म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • निर्भीड बोलणे – निर्भीड वागणे म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • मराठीचा श्वास – हिंदुत्वाचा ध्यास व राष्ट्रभक्तीचा अंगार म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • हळव्या मनाचे, हास्यविनोद करणारे पण प्रसंगी तिसरा नेत्र उघडणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • शेतकरी-कष्टकरी-कामगारांचा आधार म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • तमाम शिवसैनिकांवर पितृवत् प्रेम करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • प्रथम राष्ट्र आणि मग महाराष्ट्र हा विचार अंगिकारून, ‘जय हिंद ! जय महाराष्ट्र ! वंदे मातरम!!’ हा मंत्र; हा विचार देणारे, जपणारे आणि जोपासणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…” असे उद्गार काढताच तमाम उपस्थित जनतेने जयघोष करीत टाळ्यांचा कडकडाट करायला लावणारे चैतन्य म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • राजकारणातील फायदे-तोटे यांचा विचार न करता देशहिताला प्राधान्य देणारे नेते म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • जात-पात न मानता कार्यकर्त्यांना उमेदवारी/पदे देणारा एकमेव पक्ष आणि एकमेव नेता म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सामान्यांना, असामान्य (नगरसेवक, महापौर, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष) करणारा एकमेव नेता म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • ब्राह्मण-ब्राह्मणेतर, मराठा-मराठेतर, शहाण्णव कुळी/ब्याण्णव कुळी, घाटी-कोकणी, दलित-दलितेतर, स्पृश्य-अस्पृश्य हे सारे भेद गाडून एक व्हा, हा जातीयवाद गाडण्याचा मंत्र देणारे द्रष्टे व्यक्तिमत्त्व म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • मंडल आयोगावेळी जाती नष्ट होणार नाहीत तर जाती अधिक दृढ होतील, जातीयता वाढेल म्हणून मंडल आयोगाला कडाडून विरोध करणारे देशातील एकमेव राजकीय नेतृत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • गरीब आणि श्रीमंत या दोनच जाती आहेत असे ठाम मानणारे राजकीय नेतृत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • आरक्षण जाती-पातीवर अवलंबून असू नये, ज्याची आर्थिक स्थिती कमकुवत असेल मग तो कोणत्याही जातीचा असू दे आणि ज्याच्याकडे गुणवत्ता आहे, त्यास प्राधान्य द्यायला पाहिजे असे परखड मत व्यक्त करणारे राजकीय नेतृत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • पोटाला जात नसते. रिकाम्या हाताला काम आणि रिकाम्या पोटाला अन्न द्या हा मानवतेचा विचार देणारे नेतृत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • राजकीय सत्तापदांपासून स्वत:ला दूर ठेवणारे राजकारणातील एकमेव नेतृत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • ४६ वर्षे एकाच व्यक्तीने एका पक्षाचे नेतृत्व केले असे इतिहासात दुसरे उदाहरण नाही असा विश्वविक्रम करणारे नेतृत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख.
 • ४६ वर्षे एकच मैदान (शिवाजी पार्क), एकच वक्ता (बाळासाहेब), एकच झेंडा (भगवा) आणि लक्षावधी श्रोते असे राजकीय नेतृत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख.