मुंबई शहरास प्रतिदिनी सरासरी ३३५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणी हेच जीवन असल्याने पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणे आपले कर्तव्य आहे. ब्रिटीशकालीन गळक्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम केले गेल्याने फुकट जाणारे पाणी वाचवण्यात यश आले आहे.

कशासाठी पाण्यासाठी

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला अखंडित पाणीपुरवठा व्हावा यासाठी मुंबई महापालिकेतर्फ़े सातत्याने प्रयत्न करण्यात येतात. त्यापैकीच एक प्रकल्प म्हणजे ४५५ द.ल.लि. क्षमतेचे मध्य वैतरणा धरण. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी धरण बांधणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिलीच महापलिका आहे. हा प्रकल्प ७० टक्के पूर्ण झाला असून या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर पाण्याची उपलब्धता निश्चितच वाढणार आहे. पाच वर्षांपुर्वी मुंबईमध्ये प्रतिदिन २९०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत होता. आजच्या घडीला सुमारे दीड कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई शहराला तब्बल ३३५० द. ल. लि. पाणीपुरवठा होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हिंदुस्थान आणि जगातील पाण्याचे दर लक्षात घेता मुंबई महापालिलेतर्फ़े अत्यंत स्वस्त दरात नागारिकांना पाणीपुरविण्यात येते. घरगुती वापरासाठी झोपडपट्टीवासीयांना २.२५ रुपये प्रति हजार लिटर तर इमारतीत राहणाऱ्यांना ३.५० रुपये प्रति हजार लिटर दराने पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपट्टीच्या स्वस्ताईच्या बाबतीत जगभरात मुंबई महापालिकेचा दुसरा क्रमांक आहे, असे अलीकडेच फ़ॉर्च्युन मासिकानेही प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमुद करण्यात आले आहे. मुंबईतील अनेक जलवाहिन्या ब्रिटीशकालीन होत्या. या जलवाहिन्या बदलण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. एकूणच मुंबईत जलसुराज्य यावे, यासाठी मुंबई महापालिका सदैव तत्पर असते.

पाणीप्रश्नावर ७५ किमीच्या जलवाहिन्यांचा उपाय

water11मुंबईची लोकसंख्या सध्या दीड कोटीच्या घरात असल्यामुळे मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्नही बिकट बनत चालला आहे. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने २००९-१० मध्ये जलवितरण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विविध व्यासाच्या ७५ कि. मी. लांबीच्या जलवाहिन्या टाकून पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पावले उचलली. तसेच पाण्याच्या वापराबाबत पाणी बचत जनजागृती प्रभावीपणे राबविण्याची मोहीमही हाती घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पाणीगळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी ब्रिटीशकालीन जलवाहिन्या बदलण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले.

मध्य वैतरणाचा भव्य प्रकल्प पूर्णत्वाकडे

water21मध्य वैतरणा प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असून त्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पूर्णत्वानंतर मध्य वैतरणा धरणातून ४५५ द.ल.लि. प्रतिदिन पाणी मिळू लागेल. गारगाई प्रकल्पाच्या ४४० दशलक्ष लिटर प्रतिदिन इतका पाणीपुरवठा सुसाध्यतेचा अहवाल तयार करण्यासाठी राष्ट्रीय मंडळाची परवानगी मिळणे आवश्यक आहे. भविष्यातील पाणीपुरवठ्याची गरज भागविण्यासाठी गारगाई व पिंजाळच्या महाप्रकल्पांसाठी आता पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.

मुंबईकरांना पाणी पुरविण्यासाठी जलवाहिन्या आणि भूमिगत बोगदे

water31मुंबईकरांना पाणी पुरविण्यासाठी भूमिगत बोगदे बांधण्याचेही काम मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे. अशा पध्दतीने मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आली. जसजशी लोकसंख्या वाढत गेली त्या प्रमाणात मुंबईकरांची पाण्याची निकड वाढत गेली. महानगरपालिकेने ती पूर्ण करण्यासाठी देखील कोणतीही कसर सोडली नाही. मलबार हिल ते क्रॉस मैदान हा २.२ मी. व्यासाचा आणि ३.६३ कि.मी. चा जलबोगदा, मरोशी ते रूपारेल कॉलेज हा ३ मी. व्यासाचा आणि १२.२५ कि.मी. चा तसेच वेरावली जलाशय ते आदर्शनगर हा २.२ मी. व्यासाचा आणि ६.९ कि.मी. लांबीचा असे भूमिगत जलबोगदे बांधण्यात येत आहेत.

स्वच्छ पाण्यासाठी अद्ययावत प्रकल्प

water41

मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात तसेच स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने अद्ययावत प्रकल्प सुरू केले.

पाण्याच्या निचऱ्यासाठी पम्पिंग स्टेशन्स

water51

शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पाठपुरावा करून मुंबईत मलनि:सारणाव्यतिरिक्त महत्त्वाच्या ठिकाणी मोठी पम्पिंग स्टेशन्स लावण्याचा निर्णय घेतला. मुंबई महानगरपालिकेतर्फे त्वरित ही पम्पिंग स्टेशन्स उभारण्यात आली. मुंबईतील हाजी अली व इर्ला येथील पंम्पिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले असून लव्हग्रोव्ह (वरळी), क्लीव्हलँड (वरळी) या ठिकाणी पम्पिंग स्टेशनची कामे वेगात सुरू आहेत. ब्रिटानिया (रे रोड) गजधरबंध (खारदांडा) या ठिकाणच्या पम्पिंग स्टेशनच्या कामाना लवकरच सुरुवात होणार आहे. या पम्पिंग स्टेशन्समुळे २००५ नंतर अतिवृष्टी होऊनही मुंबईत ना जलप्रलय आला ना पाणी तुंबले. एखाद-दुसरा अपवाद वगळला तर अतिवृष्टीमध्येही मुंबईकरांना कोणताही त्रास झाला नाही, तो या पम्पिंग स्टेशन्समुळेच.

इतर पर्यायातूनदेखील पाण्याची उपलब्धता

water7पाणी पुरवठा व्यवस्थित राखता यावा याकरिता केलेली विहिरी व कूपनलिकांची साफसफाई व दुरुस्ती

खोदलेल्या विहिरींची दुरुस्ती कूपनलिकांची दुरुस्ती नवीन कूपनलिका नवीन नलिका विहिरी एकूण
संख्या ९७१ १७४ ५२५ ५० १७२०
रक्कम
(रु. कोटीमध्ये)
२७.५४ १.१६ १०.८४ ०.८४ ४०.३८

वर्षा संचयन योजना

water61शुध्द पाणी केवळ पिण्यासाठी राखून अन्य दुय्यम कामे जसे शौचालय, उद्याने, परिवहन, बालगृह, अग्निशमन केंद्र यांच्या वापराकरिता पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्याची योजना म. न. पा. कडून जून २००७ पासून राबविण्यात आली असून ही तरतूद ३०० चौ. मी. आणि त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांना लागू करण्यात आली आहे. २००९ पर्यंत एकूण ९०० भूखंडांवर वर्षा संचयन योजना राबविण्यात आली.