WHO WE ARE
इतिहास
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Proin molestie, odio id consectetur elementum, enim eros dignissim
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एकत्र आलेला मराठी आवाज महाराष्ट्र राज्याच्या स्थापने नंतर मात्र काहीसा विखुरला गेला होता. याच दरम्यान मुंबईसह महाराष्ट्र व्हावा म्हणून १०५ जणांनी हुतात्मा पत्करलेल्या मुंबईत मात्र स्थलांतर, परप्रांतीयांचे प्रमाण वाढीस लागून मराठी मुलुकात मराठी माणसाचीच अवहेलना, कुचंबना होत असल्याच्या धर्तीवर त्याच सुमारास सुरु झालेल्या मार्मिक या व्यंगचित्र आधारीत साप्ताहिकातून प्रबोधनकार ठाकरे यांचे सुपुत्र व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांनी समाजाच्या आणि विशेष करून तरुणांच्या मनातील खदखद जाणून आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यातून मराठी माणसांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य हाती घेतले. बाळासाहेबांच्या या कार्यास लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना असावी या विचारातून १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली.
छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचे आराध्य दैवत आणि महाराज भवानी मातेचे भक्त. आई भवानी मातेचे वाहन असलेला वाघ हे शिवसेनेचे बोधचिन्ह खुद्द बाळासाहेबांनी साकारले. ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थावर आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्यास मुंबई आणि महाराष्ट्र भारातून भरघोस प्रतिसाद लाभला. प्रखर हिंदुत्वाचा झंजावात आणि मराठी मनाचा मानबिंदू असणारी शिवसेना आज पन्नाशी पल्याड पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात अखंड आगेकूच करीत जनसामान्यांच्या मनात आपले स्थान कायम राखून आहे.
WHO WE ARE
टाइमलाइन
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Proin molestie, odio id consectetur elementum, enim eros dignissim
MEET OUR LEGISLATIVE
Our Elected
Representatives
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua. Ut enim ad minim veniam, quis nostrud exercitation ullamco laboris nisi ut aliquip