WHO WE ARE

नेतृत्व

ABOUT US

हिंदुहृदयसम्राट
शिवसेनाप्रमुख
मा. श्री. बाळासाहेब ठाकरे

समाजातील अनिष्ठ, जाचक परंपरां विरोधात लोकप्रबोधनाचा वसा घेतलेल्या प्रबोधनकार ठाकरे यांच्या घरी बाळ ठाकरे यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला. त्या काळात सुरु असलेल्या स्वातंत्र्य लढ्याच्या माध्यमातून मनावर कोरली जात असलेली प्रखर राष्ट्रभक्ती, घरातच होत असलेले प्रबोधनकारांचे संस्कार, आणि पुढे घडलेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यांतून बाळ ठाकरे यांची वैचारिक दिशा स्पष्ट होत बाळासाहेब ठाकरे नामक वादळ महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास आले.

  • अधिक वाचा

    १९६० मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमान पत्रातील व्यंग चित्रकाराची नोकरी सोडून बाळासाहेबांनी स्वतःचे मार्मिक हे मराठीतील पहिले राजकीय आणि व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले, जे महाराष्ट्रातील मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे प्रभावशाली माध्यम ठरले. मार्मिकच्या माध्यमातून बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान चेतावण्याचे कार्य हाती घेतले.

    मराठी माणसाच्या होणाऱ्या गळचेपी विरोधातील हा लढा संघटीत स्वरुपात अधिक तीव्र करीत मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना काढण्याचा निर्णय प्रबोधनकारांशी आणि सहकाऱ्यांशी दीर्घ विचार विनिमयांती बाळासाहेबांनी घेतला आणि १९ जून १९६६ या दिवशी महाराष्ट्रात शिवसेनेचा जन्म झाला, आणि बाळासाहेब ठाकरे यांना अखंड महाराष्ट्र ‘शिवसेना प्रमुख” म्हणून ओळखू लागले. मनाचा ठाव घेणारे प्रभावशाली लेखन व भेदक वक्तृत्व ही बाळासाहेबांची खास शैली आणि म्हणूनच महाराष्ट्रात त्यांच्या लेखन आणि भाषणांना ठाकरी शैली अशी विशेष ओळख मिळाली.

    १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भगवा फडकला, आणि बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रात निर्विवाद नेते ठरले. दोन रुपयांत गरीबांना झुणकाभाकर देणे हे त्यांचे स्वप्न युतीचे सरकार राज्यात आल्यावर प्रत्यक्षात आले. राज्यात मातोश्री वृद्धाश्रमांची साखळी, झोपडीधारकांना मोफत घरे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अशी अनेक स्वप्ने जपत महाराष्ट्राच्या सामाजिक व भौतिक विकासाचा ध्यास बाळासाहेबांनी घेतला.

    राजकारणात तळपते आणि रोखठोक आक्रमक विचार मांडणारे बाळासाहेब व्यक्तीगत आयुष्यात मात्र, खूप प्रेमळ आणि कुटुंबवत्सल होते. शिवसैनिक हा माझा प्राण आहे, ही माझी संपत्ती आहे आणि ऊर्जा आहे, असे सांगत बाळासाहेबांनी असंख्य शिवसैनिकांची हृदये काबीज केली. तमाम हिंदूकरिता आदरणीय असणारे, मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदूत्वाच्या प्रसारासाठी आपल्या लेखणीची आणि प्रखर वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचे जनसामान्यांच्या हृदयातील स्थान अढळ आहे.

ABOUT US